मविआच्या विजयाच्या सूजेवर हिंदुत्वाचा बाम लावा : मुख्यमंत्री शिंदे
Santosh Gaikwad
June 20, 2024 12:47 PM
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जी विजयाची सूज आली आहे त्या सुजेवर आता हिंदुत्वाचा झंडू बाम लावण्याची वेळ आली आहे त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी सोहळयात केले.
बुधवारी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिन वरळीतील एनएसआय डोम येथे आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले कीए लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने घासून पुसून नव्हे तर ठासून विजय मिळवला आहे काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला सोडविण्यासाठी दोन वर्षापूर्वी केलेल्या उठावावर जनतेले शिक्कामोर्तब केले आहे उध्दव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी झाली आहे बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आता हिंदु असल्याचे सांगायला आणि बोलायला घाबरत आहेत उध्दव ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा आणि फोटो लावून मते मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है अशी गर्जना केली होती आज ती हिंमत उध्दव ठाकरें यांच्यात नाही धनुष्यबाण पेलण्याची ताकद आपल्यात असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले
निवडणुकीतील कामगिरीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की शिवसेनेचे १९ टक्के मूळ मतदार होते त्यापैकी १४ टक्के मते आपल्यासोबत आली साडेचार टक्के मतेच उध्दव ठाकरे यांच्याकडे राहिली उबाठासोबत समोरासमोर १३ जागा लढून आपण ७ जागा जिंकल्या त्यांचा स्ट्राईक रेट ४२ टक्के तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट ४८ टक्के इतका राहिला त्यांना ६० लाख मते तर शिवसेनेला ६२ लाख मते मिळाली असे शिंदे म्हणाले.