शिवाजी पार्क जिमखाना निवडणुकीत आमरे , खानोलकर , मुरकर गटाचे सर्व उमेवार विजयी !
Santosh Gaikwad
July 02, 2024 01:29 PM
मुंबई ः देशासाठी अनेक कसोटीपटू देणाऱ्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कसोटीपटू प्रवीण आमरे , संजीव ,खानोलकर ,दीपक मुरकर गटाचे सर्वच्या सर्व बावीस उमेदवार निवडून आले . शिवाजी पार्क जिमखान्याच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे ही निवडणूक शिवाजी पार्कमधीलच स्काऊट हॉलमध्ये घेण्यात आली .
पदाधीकारी , समिती सदस्य वगैरे बावीस पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ८७३ सभासदानी मतदानाचा अधिकार बजावला . अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू प्रवीण आमरे , उपाध्यक्ष समीर पेठे , महेश आगवणे , अमर तेंडूलकर तसेच कार्याध्यक्ष म्हणून दीपक मुरकर , मानद सचिव संजीव खानोलकर , सहाय्यक चिटणीसः सुनील रामचंद्रन , खजिनदार ःविलास सोमण ,टेनिस चिटणीस ः योगेश परूळेकर , टेनिस सदस्यः चंद्रकांत राऊत , क्रिकेट सदस्य सिद्धेश किनळेकर , बिलियर्डस चिटणीस ः शेखर सुर्वे यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती .
विश्वस्तपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाधान सरवणकर , महेंद्र ठाकूर , दीपक विश्वासराव ,उपकार्याध्यक्षपदी विश्वास नेरूरकर , क्रिकेट चिटणीसपदी प्रशांत सावंत , कार्ड चिटसीसपदी अजय पाटणकर , इन्डोअर चिटणीसपदी सनील समेळ आणि कॅन्टीन चिटणीसपदी अशुतोष जोगळेकर आणि कार्यकारीणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिनेश गानू आणि ॲड संकेत बापट निवडून आले .
निवडणकू अधिकारी म्हणून ॲड . मोहन खटावकर यानी काम पाहिले .