52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
कर्नाटक : कर्नाटकातील काँग्रेस मधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे.सिद्धरामैया हे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. येत्या 20 ने ल 12:30वाजता शपथविधी होणार आहे
कर्नाटकमध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे मात्र शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री पदाचा गोधळ संपला आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी वाटणी केली आहे. सिद्धरामैया यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पदली आहे. तर डीके शिवकुमार यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे.