सिंपलतर्फे झोमालँड मुंबईच्या विजेत्यांसाठी दुबई सहल बक्षिस
Santosh Sakpal
July 07, 2023 05:57 PM
मुंबई, – समीर कांबळे, राहुल शेट्टीगर आणि तेजस चौधरी हे सिंपल या १-टॅप चेकआउट नेटवर्कने आयोजित केलेल्या झोमालँड स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांचा देशभरातील सात भाग्यवान विजेत्यांमध्ये समावेश झाला असून कंपनीने त्यांच्यासाठी स्वखर्चाने दुबईची सहल भेट म्हणून दिली आहे.
सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या समीर कांबळे यांना आपण झोमालँड स्पर्धा जिंकल्याचे कळाल्यावर त्यावर विश्वास बसत नव्हता. ‘सिंपलने मला माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय अनुभव मिळून दिला. त्यांच्यामुळे मी वडिलांबरोबर दुबईची अनोखी सफर अनुभवली.’ सिंपल हा भारतातील आघाडीचा पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, जो ग्राहकांना एकाच टॅपमध्ये चेक आउट करण्याची सोय देतो. २६,०००+ व्यापारी भागीदारांच्या मदतीने सिंपलद्वारे आपल्या १ कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
झोमालँडच्या विजेत्यांना सिंपलने आयोजित केल्यानुसार एमिरट्स एयरलाइन्ससारख्या जगातील आलिशान विमानसेवा कंपन्यांपैकी एका विमानाने दुबईपर्यंत प्रवास करण्याची संधी मिळाली. विजेत्यांसाठी जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफामध्ये राहाण्याची सोय करण्यात आली होती. त्यांना जगातील प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एका मिशेलिन स्टार रेस्टॉरंमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळाली.
राहुल शेट्टीगर यांना बातमी कळाली तेव्हा त्यांना आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. ही त्यांची दुबईला पहिलीच भेट होती. आपल्या अनुभवाविषयी राहुल म्हणाले, ‘बुर्ज खलिफाची भव्यता आणि सौंदर्य पाहून मी थक्क झालो. अशी अनोखी संधी दिल्याबद्दल मी सिंपलचा आभारी आहे.’
एमिरट्समध्ये प्रवास करण्यापासून बुर्ज खलिफा येथे राहाण्यापर्यंत तसेच मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवण्यापर्यंत सिंपलने आम्हाला आरामदायी आणि आलिशान अनुभव मिळवून दिला. या सहलीदरम्यान मी व माझ्या आईने खूप मजा केली. ही संधी दिल्याबद्दल मी सिंपल आणि झोमालँडचा आभारी आहे, असे मुंबईत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करणारे तेजस चौधरी म्हणाले.