उपनगरात नोकरदार महिलावर्गासाठी सहा ‘सखी निवास’
Santosh Gaikwad
September 09, 2023 06:59 PM
मुंबई, दि.९: केंद्र सरकारच्या माध्यमातून नोकरदार महिलांवर्गासाठी सखी निवास योजना राबवली जात आहे. मुंबई उपनगरात सहा सखी निवासस्थाने भाडे तत्वावरील इमारतीत सुरू केले जाणार आहे. शासनाने निश्चीत केलेल्या संस्था, एजन्सीजकडून येत्या १८ सप्टेंबरपूर्वी कार्यालयीन वेळेत प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन राज्य शासनाने आवाहन केले.
नोकरदार महिलावर्गासाठी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार "मिशन शक्ती" अंतर्गत संबल" आणि सामर्थ्य" या दोन योजना राबवल्या जात आहेत. या योजनेतील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ या योजनेचा समावेश आहे. मुंबई उपनगरात सध्या कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नविन ०६ सखी निवास कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था तसेच एजन्सीकडून याद्वारे १८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत १ ला मजला, दुसरा टप्पा, आर. सी मार्ग, चेंबूर, मुंबई -७१, दूरध्वनी: ०२२-२५२३२३०८ येथे संपर्क करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने प्रस्ताव सादर करण्यास १४ जुलै २०२२ रोजी ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सुचना, अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची पध्दत, संस्था एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा, अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Santosh Sakpal
April 03, 2025
Santosh Sakpal
April 03, 2025
SANTOSH SAKPAL
April 03, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023