सिया’ बाफनाच्या स्केचचे‘ जितो’ कार्यक्रमात कौतुक ; स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराजांना त्यांचेच स्केच भेट !
Santosh Gaikwad
April 10, 2024 11:39 AM
पुणे (प्रतिनिधी):- कला ही संस्कारांचा एक भाग असून खरी कला ही आत्म्याचा अविष्कार असते तसेच खरी कला ही ईश्वराचे भक्तीपूर्ण अनुसरण करते हे कु. सिया बाफना हिच्या कलेने नुकतेच पुण्यात दाखवून दिले. जितो च्या कार्यक्रमात बेलापूर येथील स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम मंदिर अयोध्या ट्रस्ट) यांचे भावनेने काढलेले पेन्सील स्केच त्यांनाच भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्केचचे या कार्यक्रमात भरपूर कौतुक झाले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) संघटनेच्या पुणे विभागाचा १८ वा वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वामी श्री गोविंददेव महाराज यांचे हस्ते समाजातील मान्यवारंना जीवन गौरव सेवा तसेच इतर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमातच श्रीरामपूर येथील विद्यार्थिनी कु. सिया बाफना हिने पेन्सीलने काढलेले स्वामी श्री गोविंददेव गिरी यांचे स्केच (पोट्रेट) स्वामींना भेट देवून सत्कारित करण्यात आले. या स्केचचे या कार्यक्रमात खुप कौतुक होत आहे.
यावेळी स्वामींच्या हस्ते प्रमिलाताई नौपतलाल साकला यांना जीवन गौरव, औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजय उदयबाबु सामाजिक सेवेसाठी विनोद शंकरलाल राठोड, व्यावसायिक सुजित जैन, युवा उद्योजक सुधेंदु चेतन शहा, डॉ. प्रज्ञा लोढा तसेच संस्थापक कार्यासाठी श्रुतभवन श्रुतदीप रिसर्च फाऊंडेशन यांचा गौरव करण्यात आला.
पुढच्या पिढीचे आचरण कसा असावे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच समाजासाठी चांगले कार्य करणार्या हिर्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी स्वामी श्री गोविंददेवगिरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेशकुमार साकला यांनी केले तर अॅड. विशाल शिंगवी, चेतन भंडारी, कांतीलाल ओसवाल यांनी जितोच्या उपक्रमाची माहिती दिली. रविंद्र साकला यांनी स्वामींचा परिचय करून दिला तर संजय डागा यांनी आभार मानले.
सियाचे कौतुक - श्रीरामपूर येथील महाले पोतदार कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहे. प्रगती आशिषजी बाफना यांची ती मुलगी असून तथा सामाजिक कार्यकर्ते अभय बाफना यांची ती पोती आहे. लहानपणापासूनच तिला चित्रकलेची विशेषत: स्केच (पोट्रेटची) आवड असून घरच्यांच्या सहकार्याने तिने ही कला जोपासली आहे. अनेक मान्यवरांचे स्केच तिने काढलेले आहे. शाळेत चित्रकलांची ईलीमेंटरी व इंटरमिडिया परिक्षा तिने ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण केली आहे. ती वाणिज्य शाखेत शिकत असली तरी शालेय जीवनापासून तिने हा छंद जोपासला आहे.
लक्ष एकाग्र करून,
शोधावे समाधान,
विनासत्यासे शक्य नसे,
होने ते महान!
सियाच्या प्रयत्नांना यश येते ते तिच्या परिश्रमामुळे, भविष्यातील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमास पिनकॉर्पचे कार्यकारी संचालक अभय मुतडा, पिन्सलचे सौरभ बोरा, जितो (पुणे) अध्यक्ष राजेशकुमार साकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल, अॅड. विशाल शिंगवी, जितो अपेळäसचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, श्रमण आरोग्यम्चे उपाध्यक्ष विजय भंडारी, अॅड. एस.के. जैन, विजयकांत कोठारी, इंदर जैन, अचल जैन, धीरज छाजेड, जितो महिला अध्यक्षा संगीता ललवाणी, क्रिडा विभाग अध्यक्ष विशाल जोरडिया, अजय, अजित सेठिया, इंदरकुमार छाजेड, उद्योगपती प्रकाश धारिवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.