मुंबई : मतदारांमध्ये खूप उत्साह आहे पण निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू आहे. मशीन बंद पाडले जातात. मतदानाला जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय असे गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी करीत संताप व्यक्त केला.
राज्यात मतदानाचा शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि मोदी सरकारवर घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले.
दरम्यान निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात संध्याकाळी सहा वाजेच्या आत आलेल्या मतदारांना टोकण देऊन मतदान करण्याची मुभा दिली.
निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिका-यांची नावे शाखेत कळवा
ठाकरे म्हणाले की, “या माध्यमातून मी पोलिंग एजंटला सांगतोय, तसेच निवडणुकीला जाणाऱ्या मतदारांनाही सांगतोय की, असं कुठलंही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत, जिथे तुम्हाला मुद्दाम उशिर केला जातोय त्याची नोंद ताबोडतोब तिथल्या शिवसेनेच्या शाखेत करा. आपण मतदानाला गेल्यानंतर आपला आयडी बघतो तसं त्या निवडणूक प्रतिनिधींचा आयडीदेखील बघा, जेणेकरुन उद्या आपल्याला न्यायालयात दाद मागितली जाईल. मला त्यांची माहिती मिळाली की, मी त्यांची नावे आणि स्थळांची माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहीर करुन टाकेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“या माध्यमातून मी पोलिंग एजंटला सांगतोय, तसेच निवडणुकीला जाणाऱ्या मतदारांनाही सांगतोय की, असं कुठलंही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत, जिथे तुम्हाला मुद्दाम उशिर केला जातोय त्याची नोंद ताबोडतोब तिथल्या शिवसेनेच्या शाखेत करा. आपण मतदानाला गेल्यानंतर आपला आयडी बघतो तसं त्या निवडणूक प्रतिनिधींचा आयडीदेखील बघा, जेणेकरुन उद्या आपल्याला न्यायालयात दाद मागितली जाईल. मला त्यांची माहिती मिळाली की, मी त्यांची नावे आणि स्थळांची माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहीर करुन टाकेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सर्वात आधी आम्ही आयोगाकडे तक्रार केली, ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे : फडणवीस
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्थप्रथम आम्हीच आयोगाकडे केली आता मात्र नेहमीप्रमाणे उध्दव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केले आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरेंनी मोदी यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांनी ट्ववीट करीत प्रत्युत्तर दिलं आहे. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की मतदान केंद्रावर जा आणि मोठया संख्येने मतदान करा सहा वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील त्या प्रत्येकाला मतदान करता येते त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका असेही फडणवीसांनी आवाहन केले आहे.