कार म्हणजे नवीन सोने : अक्षय्य तृतीयेला संपूर्ण भारतात स्पिनीने 800+ रिटेल कारची डिलिव्हरी केली

Santosh Sakpal May 05, 2025 05:49 PM

MUMBAI : या डिलिव्हरीमध्ये बंगळुरू, महाराष्ट्र आणि दिल्ली आघाडीवर; मागण्यांमध्ये बलेनो, ग्रँड आय10 आणि क्विड अव्वल; एसयूव्ही आणि ऑटोमॅटिक्सची मागणी वाढती

भारतातील आघाडीच्या वापरलेल्या गाड्यांचा रिटेल प्लॅटफॉर्म, स्पिनीने देशभरात एकाच दिवसात 800+ कार डिलिव्हरी करत  अक्षय्य तृतीया 2025 साजरी केली. हे एका नवीन युगाचे प्रतीक आहे जिथे भारतीय कुटुंबांसाठी प्रगती, समृद्धी तसेच नवीन सुरुवात करण्यासाठी कार म्हणजे नवीन सोने आहे.

मोठ्या खरेदीसाठी शुभ काळ समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला बेंगळुरू, महाराष्ट्र (मुंबई + पुणे) आणि दिल्ली-एनसीआर या प्रमुख शहरांमध्ये खरेदीसाठी मागणी वाढली. अन्य प्रमुख शहरांमध्ये अहमदाबाद आणि चेन्नई यांचा समावेश होता. विक्री केंद्र डिलिव्हरी असो किंवा वैयक्तिकृत होम डिलिव्हरी असो, देशभरातील ग्राहकांना अखंड आणि आनंदी अनुभव मिळाला.

प्रमुख ग्राहक ट्रेंड - एप्रिल 2025:

महिला कार खरेदीदारांमध्ये वाढ: एप्रिलमध्ये 1,000 हून अधिक महिला खरेदीदार, वार्षिक 25% वाढ

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये वाढ: एकूण डिलिव्हरीमध्ये 60% वाढ झाल्याने शेअर 21% (एप्रिल 2024) वरून 29% पर्यंत वाढला

एसयूव्हीत तेजी: एसयूव्ही डिलिव्हरीमध्ये वार्षिक 28% वाढ

इंधन प्राधान्य: पेट्रोलला जास्त मागणी, 85% डिलिव्हरी पेट्रोल गाड्यांची 

टॉप रंग: पांढरा, राखाडी आणि लाल रंगाला 60% ग्राहकांचे प्राधान्य 

वित्तपुरवठा वाढण्याचा ट्रेंड: कर्ज-समर्थित खरेदीमध्ये 28% वार्षिक वाढ; 500+ ग्राहकांनी कार एक्सचेंज पर्याय निवडला

सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजे मारुती, ह्युंदाई आणि होंडा, ज्यांचा एकूण डिलिव्हरीपैकी एकत्रितपणे वाटा 63% होता. बलेनो, ग्रँड आय१० आणि क्विड हे देशभरातील सर्वात पसंतीचे मॉडेल म्हणून समोर आले.

स्पिनीचे संस्थापक आणि सीईओ नीरज सिंग म्हणाले: “अक्षय्य तृतीया हा असा काळ आहे जेव्हा कुटुंबे नवीन सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्राहकांनी स्पिनीला त्यांच्या या नवीन सुरुवातीचा भाग म्हणून निवडले याचा आम्हाला अभिमान आहे. ग्राहक सध्या विश्वासार्ह, उच्च-गुणवत्तेच्या कारकडे वळत आहेत. विश्वास, पारदर्शकता आणि संपूर्ण भारतात प्रीमियम कार खरेदी अनुभव देण्यासाठी आम्ही स्पिनी येथे वचनबद्ध आहोत.”

सचिन तेंडुलकर यांचा समावेश असलेल्या स्पिनीच्या अलीकडच्या "गॉड प्रॉमिस" मोहिमेत, अ‍ॅश्युअर्ड+ सह 3 वर्षांची वॉरंटी, 5 दिवसांच्या मनी बॅक गॅरंटीसह निवड करण्यासाठी 10000+ कार पर्याय आणि विक्रेत्यांसाठी सर्वोत्तम किंमत हमी ही अशा प्रकारच्या बिझनेसमधली त्यांची पहिलीच ऑफर आहे. स्पिनीच्या प्री-ओन्ड कार क्षेत्रात गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या वचनाला बळकटी देते, ज्यामुळे भारतातील ग्राहकांमध्ये देखील तो विश्वास येतो आणि ते अपग्रेड होतात.