टीटीके प्रेस्टिज – स्‍वच्‍छ निओ गॅस स्‍टोव्‍ह, सुलभपणे साफसफाई करता येण्‍यासाठी लिफ्टेबल बर्नर्स असलेला गॅस स्‍टोव्‍ह

SANTOSH SAKPAL March 25, 2023 12:00 AM

➢        होम कूक्‍ससाठी लिफ्टेबल बर्नर्ससह साफसफाई करणे सुलभ झाले

➢        आकर्षक व लक्षवेधक किचनसाठी 

मुंबई : टीटीके प्रेस्टिज या देशातील अग्रगण्‍य किचन अप्‍लायन्‍स ब्रॅण्‍डने नाविन्‍यतेप्रती आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत त्‍यांचा स्‍वच्‍छ निओ गॅस स्‍टोव्‍ह लॉन्‍च केला. सुलभ व सुरक्षित साफसफाईसाठी नवीन स्‍वच्‍छ निओमध्‍ये लिफ्टेबल बर्नर्स आहेत, जे जलदपणे साफसफाई करण्‍याची खात्री देतात.

देशभरातील व्यापक संशोधनाला प्रतिसाद म्हणून या आवि‍ष्‍काराची संकल्पना करण्यात आली होती, ज्यावरून निदर्शनास आले की वापरानंतर गॅस स्टोव्ह साफ करण्याच्या अडचणीमुळे गृहिणी अधिकाधिक निराश होत आहेत. लिफ्टेबल बर्नर्ससह टीटीके प्रेस्टिजच्या स्वच्छ निओ गॅस स्टोव्हने ग्राहकांच्या त्रासांचे निराकरण केले. यामधून सुरक्षित व सुलभ साफसफाई प्रक्रियेची खात्री मिळते.

विशेषत: भारतीय किचन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेला स्‍वच्‍छ निओ गॅस स्‍टोव्‍ह सोयीसुविधा, व्हिज्‍युअल आकर्षकता, सुलभ वापर आणि सुधारित कार्यक्षमतेला महत्त्व देणाऱ्या व्‍यस्‍त गृहिणींसाठी उपयुक्‍त आहे. यामधील आकर्षक फिनिश उच्‍च दर्जाच्‍या मजबूत ग्‍लाससह किचनची आकर्षकता वाढवते. स्‍वच्‍छ निओ गॅस स्‍टोव्‍ह चार विभिन्‍न मॉडेल्‍समध्‍ये येतो, ज्‍यामुळे होम कूक्‍सना विविध पर्याय मिळतात. दोन व तीन-बर्नर गॅस स्‍टोव्‍ह्ज, तसेच दोन चार-बर्नर मॉडेल्‍स देखील उपलब्‍ध आहेत. तीन व चार-बर्नर मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध जम्‍बो बर्नर जलद कूकिंगसाठी उपयुक्‍त आहे.

स्‍वच्‍छ निओ गॅस स्‍टोव्‍ह आयएसआय प्रमाणनासह येतो. २-बर्नर मॉडेलची किंमत ८२४५ रूपये आहे, तर ३-बर्नर मॉडेलची किंमत १०९४५ रूपये आहे. चार बर्नर मॉडेल्‍सची किंमत २५ टक्‍क्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या ऑफरसह अनुक्रमे १३,३९५ रूपये व १३,८९५ रूपये आहे, कलेक्‍शन प्रेस्टिज एक्‍सक्‍लुसिव्‍ह ठिकाणी, निवडक डिलर आऊटलेट्स, एक्‍सक्‍लुसिव्‍ह ई-स्‍टोअर https://shop.ttkprestige.com/ आणि इतर प्रमुख ईकॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्‍ध आहे.