एसव्हीसी बँकेच्या वतीने रविंदर सिंग यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती

Santosh Sakpal May 16, 2023 08:56 PM


आर्थिक वर्ष 2022-23 च्या निकालांची घोषणा; एकूण व्यवसायाने ओलांडला रू 33400 कोटींचा पल्ला, एनपीएटी 20% वधारला

 12 मे 2023; मुंबई: एसव्हीसी बँक (एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड म्हणजे पूर्वीची शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड), भारतातील आघाडीच्या सहकारी बँकांपैकी एक असून आज बँकेच्या वतीने श्री. रविंदर सिंग यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून बढती जाहीर करण्यात आली. श्री. सिंग सात वर्षांहून अधिक काळ बँकेत कार्यरत आहेत. सध्या जानेवारी 2023 पासून व्यवस्थापकीय संचालक (अंतरिम) पदाचा कार्यभार सांभाळत होते.

श्री. सिंग यांना ब्रांच बँकिंग, रिटेल, लार्ज, मिड-मार्केट, एसएमई आणि मायक्रो सेगमेंट कर्ज व्यवसाय आणि जोखीम विभागांचा दीर्घ कालावधीसह, बँकिंग क्षेत्रात तीन दशकांहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवातील सुमारे दोन तृतीयांश काळ त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेत अनुभव घेतला. त्यांचा कार्यकाळ प्रत्येक बँकेत दशकभराचा राहिला.  याशिवाय, त्यांनी देना बँक आणि स्टेट बँक ऑफ पटियालासह महत्त्वपूर्ण बँकांमध्येही काम केलं आहे. श्री. सिंग ऑगस्ट 2016 मध्ये एसव्हीसी बँकेत रुजू झाले. अंतरिम व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कॉर्पोरेट बँकिंग हाताळणारे मुख्य महाव्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम सांभाळले. श्री सिंग हे आयआयएम, कोझिकोडचे माजी विद्यार्थी आहेत.

या प्रसंगी, एसव्हीसी बँकेचे चेअरमन श्री. दुर्गेश एस. चंदावरकर म्हणाले, “आमच्याकडे कर्मचाऱ्यांतील गुणवत्ता ओळखण्याची आणि वाढवण्याची प्रदीर्घ संस्कृती आहे. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्री. रविंदर सिंग यांच्या पदोन्नतीने ही संस्कृती पुढे चालली आहे याचा मला आनंद आहे. एक समूह नेतृत्व म्हणून श्री. सिंग यांनी त्यांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभवामुळे आणि भक्कम आचारसंहितांद्वारे गेल्या काही वर्षांत बँकेच्या वाढीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या नवीन भूमिकेत, श्री. सिंग बँकेला केवळ वाढीच्या नव्या सीमांकडे घेऊन जाणार नाहीत, तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, नवीन पिढीला मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि बँकेला उत्कृष्टतेच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रेरणा देतील.”

या प्रसंगी बोलताना, एसव्हीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री रविंदर सिंग म्हणाले, “या नवीन भूमिकेसाठी मंडळ आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. गेल्या काही वर्षांत, आम्ही एसव्हीसी बँकेत वेगवान वाढीचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या शतकातील मजबूत पाया निर्मितीच्या जोरावर समृद्ध, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि आचारसंहिता अबाधित ठेवत बँकेतील हजारो प्रेरीत कर्मचारी सदस्यांना नवीन स्थान निर्माण करण्यासाठी सक्षम करण्याची नवीन भूमिका माझ्यासाठी एक जबाबदारी आहे. आम्ही योग्य दिशेने मार्गक्रमणा करत आहोत याचे दिशादर्शक 2022-23 साठीचे निकाल आहेत. विकास परिवर्तनाच्या पुढील टप्प्यात बँकेच्या प्रवासात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे.”

 दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी संपन्न झालेल्या सदस्य मंडळ बैठकीत 2022-23 करिता वित्तीय परिणामांची घोषणा बँकेच्या वतीने करण्यात आली.