ठाण्यात निवासी सोसायटीत इव्ही चार्जिंग सुविधा सुरु ; इव्ही मालकांना २४X७ घेता येणार टाटा पॉवर ईझेड चार्ज सुविधेचा लाभ

santosh sakpal April 01, 2023 12:21 AM

ठाणे, : टाटा पॉवरने ठाण्यात घोडबंदर रोडजवळ ऋतू कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये चार नवीन इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चार्जिंगसाठी यांचा लाभ घेता येणार आहे. ठाण्याचे माननीय आमदार श्री. संजय केळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी या सुविधेचा उदघाटन समारंभ पार पडला.

इव्ही मालकांना देखभाल सहाय्याबरोबरीनेच या चार्जिंग सुविधेचा लाभ २४X७ घेता येईल. टाटा पॉवर ईझेड चार्ज मोबाईल ऍप्लिकेशनमार्फत ग्राहक सर्व सेवा कनेक्ट करू शकतील, चार्जिंग स्टेशनचे नेमके ठिकाण शोधून काढणे, वाहनाच्या चार्जिंगवर दुरून लक्ष ठेवणे आणि ई-पेमेंट्स अशा विविध सेवांचा लाभ ते या ऍपमार्फत घेऊ शकतील.

टाटा पॉवरने संपूर्ण शहरभरात १२३१ चार्जिंग पॉईंट्स उभारले आहेत ज्यामध्ये ५५० पेक्षा जास्त निवासी सोसायट्यांमधील चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. टाटा पॉवर ही भारतातील एक सर्वात मोठी इव्ही चार्जिंग सुविधा पुरवठादार आहे. ४९३ ठिकाणच्या ३०६० सार्वजनिक व कॅप्टिव्ह इव्ही चार्जिंग पॉईंट्सना टाटा पॉवरने ऊर्जा पुरवली असून, त्यामध्ये ३०,००० पेक्षा जास्त घरगुती चार्जर्स व २३४ बस चार्जर्सचा समावेश आहे. २०२५ सालापर्यंत देशभरात २५,००० इव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारण्याच्या योजनेची घोषणा टाटा पॉवरने केली आहे.

लोकांनी विजेवर चालणाऱ्या वाहनांना जास्तीत जास्त पसंती द्यावी यासाठी प्रोत्साहक ठरेल असे चार्जिंगचे विश्वसनीय आणि सुविधाजनक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवून भारतात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर सुविधाजनक बनवण्यासाठी टाटा पॉवर बांधील आहे. हरित व शुद्ध ऊर्जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्नशील राहून भारताच्या हरित ऊर्जा परिवर्तनाला वेगवान बनवण्याचा टाटा पॉवर चा सस्टेनेबल इज अटेनेबल हा उपक्रम सुरु आहे, हरित सेवा, सुविधा, उत्पादने यांचा जास्तीत जास्त प्रसार करून पर्यावरणपूरक, शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करणे सहजशक्य आहे हे दाखवून देण्यासाठी टाटा पॉवर सतत प्रयत्नशील असते.