टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे पहिल्या महाराष्ट्र न्यूरोडायव्हर्सिटी समिटचे आयोजन

SANTOSH SAKPAL May 03, 2023 02:43 PM

समिटमध्ये ऑटीजमविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त संस्था एकत्र आल्या

● न्यूरोडायव्हर्सिटीसंदर्भात सध्या केले जात असलेले प्रयत्न जास्तीत जास्त अनुकूल असावेत यासाठी एक प्रभावी मंच व सहयोगात्मक दृष्टिकोन

● पे ऑटेन्शनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑटिजम सपोर्ट चॅम्पियन्ससाठी सुरु केले व्हॉलंटीयरींग मोड्यूल

● ऑटिजमचे लवकरात लवकर निदान केले जावे, त्याचा स्वीकार केला जावा आणि तंत्रज्ञान, लोक व सरकारी योजना यांच्या एकत्रित शक्तीचा वापर करून देखभाल पुरवली जावी यासाठी साहाय्य पुरवतील अशा इकोसिस्टिम्स निर्माण केल्या जाणार.

मुंबई, 1 मे २०२३: टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने आपल्या पे ऑटेन्शन ऑटिजम सपोर्ट उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात ऑटिजमसाठी सहायता नेटवर्क सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पहिल्या 'महाराष्ट्र न्यूरोडायव्हर्सिटी मीट'चे आयोजन केले होते. न्यूरोडायव्हर्सिटी आणि ऑटिजम या विषयांमध्ये काम करणाऱ्या ५० पेक्षा जास्त संस्थांना आपली पोहोच वाढवता यावी यासाठी एकमेकांशी समन्वय व सहयोग करता यावा यासाठी या मंचावर एकत्र आणण्यात आले होते.

टाटा पॉवरचे सीएचआरओ, चीफ सस्टेनेबिलिटी आणि सीएसआर श्री. हिमल तिवारी यांनी या परिषदेचे उदघाटन केले. विचारवंत, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अंगणवाडी कार्यकर्त्या, कॉर्पोरेट्स आणि या क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित होते. आपले अनुभव इतरांसमोर मांडण्यासाठी आणि पे ऑटेन्शनच्या प्रयत्नांना अधिकाधिक उत्तेजन देण्यासाठी ते एकत्र आले होते. सामाजिक न्याय आणि सक्षमता मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पीपल विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीजचे प्रमुख डॉ रवी सिंग, टाटा एलक्ससी, हेल्थकेयर अँड लाईफसायन्सेस डिजिटल सोल्युशन्सच्या हेड ऑफ डिलिव्हरी श्रीमती मणी गुप्ता, मन सेंटर फॉर इंडिविज्युअल विथ स्पेशल नीड्सच्या संस्थापिका श्रीमती दिलशाद मेहेरशाही, अटिपिकल ऍडव्हान्टेजचे संस्थापक श्री. विनीत सराईवाला, विकलांग सहारा समितीचे संस्थापक व सीईओ श्री. कपिल कुमार अगरवाल, आयआयटी मुंबईचे ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस विभागाचे सायकोफिजिओलॉजी लॅबोरेटरीचे प्रोफेसर डॉ अझिझुदीन खान, साऊंड स्पेसमधील कामाक्षी आणि विशाला यांचा प्रमुख उपस्थितांमध्ये समावेश होता. पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या या परिषदेमध्ये तज्ञांच्या सत्रांची एक सीरिज, भिन्न-सक्षम युवकांनी चालवलेल्या कॅफे अर्पणमधून कला व खाद्यपदार्थ, 'ऍक्सेस फॉर ऑल' आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा समावेश करण्यात आला होता ज्यामुळे सहभागी झालेल्यांना न्यूरोडायव्हर्सिटीचा अनुभव घेऊन कौतुक करण्याची संधी मिळाली.

पे ऑटेन्शनची सुरुवात करण्यात आल्यापासून गेल्या वर्षभरात या नेटवर्कमार्फत काम करण्यासाठी विविध भागांमधील अनेक संस्था व व्यक्ती एकत्र आल्या आहेत. २०२७ सालापर्यंत १,००० संस्थांपर्यंत पोहोचण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आजवर या उपक्रमाने कार्यशाळा, पथनाट्ये, शैक्षणिक व्हिडिओ आणि हेल्पलाईनमार्फत १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श केला आहे. ऑटिजम लवकरात लवकर ओळखता यावा आणि समाजामध्ये याविषयी जागरूकता निर्माण केली जावी यासाठी ९०० पेक्षा जास्त अंगणवाडी कार्यकर्त्या, सहाय्यक नर्सेस आणि सुईणी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. समाजातील तळागाळामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि ओडिशामध्ये २४ पेक्षा जास्त पथनाट्ये आयोजित करण्यात आली होती. ग्लोबल कम्युनिटी-केअर मॉडेल्समधून माहिती व विचारांची देवाणघेवाण व्हावी, अधिक जास्त समावेशक बनण्यासाठी शैक्षणिक व्यावसायिकांना प्रशिक्षित केले जावे, ऑटिजमचे लवकरात लवकर निदान केले जावे, त्याचा स्वीकार केला जावा आणि देखभाल पुरवली जावी यासाठी फिजिटल इकोसिस्टिम निर्माण करावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, "न्यूरोडायव्हर्सिटीचा विषय मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देत, समावेशाला प्रोत्साहन देण्याच्या आणि ऑटिजमग्रस्त व्यक्तींसाठी प्रचंड मोठी सहायक इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी पे ऑटेन्शनची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात या उपक्रमाने समाजातील तळागाळामध्ये जागरूकता निर्माण करून, संपूर्ण देशभरात सहायक चळवळ चालवली जावी यासाठी कॉर्पोरेट्स, सामाजिक उद्यम आणि सरकारी मंत्रालये यासारख्या हितधारकांना एकत्र आणण्यासाठी एक मोठा ब्रिडजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर दिला. त्रुटी दूर करून नेटवर्कपर्यंतची पोहोच वाढवण्यासाठी आमच्याशी सहयोग करण्यासाठी अधिकाधिक संघटना व सहाय्यक चॅम्पियन्सना यामध्ये सहभागी करवून घेण्याचा आमचा उद्देश आहे."

टाटा पॉवरचे सीएचआरओ, चीफ सस्टेनेबिलिटी आणि सीएसआर श्री हिमल तिवारी यांनी सांगितले, "सर्वसमावेशक वृद्धी घडून यावी असे आम्हाला वाटते, त्यामुळे टाटा समूहाच्या समुदाय विकास तत्वज्ञानमध्ये प्रमुख असलेला विचार पे ऑटेन्शनमध्ये प्रदर्शित केला जात आहे. ऑटिजम आणि न्यूरोडायव्हर्सिटीबद्दलची जागरूकता अजूनही खूप कमी आहे, आजही आपल्या समाजामध्ये जागरूकतेचा अभाव, गैरसमज, शंका आहेत, बऱ्याच लोकांना याविषयी लाज देखील वाटते, त्यामुळे आपल्याला बरेच काम करावे लागेल. आमच्या पे ऑटेन्शन उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत आहे, समावेशाच्या या वाटचालीत ज्यांनी आमची साथ दिली त्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. महाराष्ट्र न्यूरोडायव्हर्सिटी परिषदेच्या माध्यमातून टाटा पॉवरने ब्रिडजिटल कनेक्टिव्हिटीमार्फत लोकांना एकत्र आणण्याच्या आणि हे नेटवर्क प्रत्येकापर्यंत, खास करून न्यूरोडायव्हर्स स्थितींनी ग्रस्त असलेल्या ग्रामीण भागांमधील व्यक्तींपर्यंत सहजपणे पोहोचवण्याच्या आपल्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला आहे. याआधी आयोजित केलेल्या नॅशनल राउंडटेबल वर्कशॉपनंतर आता राज्य स्तरावरील नेटवर्क परिषदांचे आयोजन करून देशभरातील इतर प्रमुख क्षेत्रांचा देखील यामध्ये समावेश केला जाईल."

यावेळी अटिपिकल ऍडव्हान्टेजचे संस्थापक श्री. हिमल तिवारी आणि श्री. विनीत सराईवाला यांनी पे ऑटेन्शन व्हॉलंटीयर-चॅम्पियन्स ट्रेनिंग मॅन्युअल फॉर ऑटिजम अवेयरनेस प्रकाशित केले. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने आपले नॉलेज पार्टनर कॅडरेच्या सहयोगाने हे तयार केले आहे. या परिषदेमध्ये एक संवादात्मक पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये न्यूरोडायव्हर्सिटीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक प्रभावी आऊटरिच यंत्रणेबाबत विविध क्षेत्रे कशाप्रकारे काम करू शकतील तसेच प्रभावी नेटवर्क उभारणीमध्ये स्वयंसेवी संस्थांची लक्षणीय भूमिका, न्यूरोडायव्हर्सिटी क्षेत्रात नेटवर्किंगची प्रक्रिया, ऑटिजमविषयी साहाय्य उपलब्ध करवून देण्यासाठी सध्याच्या ग्रामीण नेटवर्कचा लाभ घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. आयआयटी मुंबईचे प्रोफेसर अझिझुद्दीन खान यांनी उपस्थितांना अपंग व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या असिस्टिव्ह तंत्रज्ञानाच्या क्षमतेविषयी माहिती दिली. सातत्यपूर्ण नावीन्य आणि न्यूरोडायव्हर्सिटी क्षेत्रात पोहोच किती महत्त्वाची आहे ते त्यांनी अधोरेखित केले.

समाज आणि कॉर्पोरेशन्स न्यूरोडायव्हर्स व्यक्तींना दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून कशाप्रकारे स्वीकारू आणि सहभागी करवून घेऊ शकतात या मुद्द्यावर भर देत या कार्यक्रमामध्ये नृत्य व संगीत सादरीकरणांचा समावेश करण्यात आला होता, न्यूरोडायव्हर्स व्यक्तींनी विविध कार्यशाळांचे देखील आयोजन केले होते, यामध्ये दगडांवरील रंगकाम, डूडलिंग आणि क्रिएटिव्ह स्टिचिंग यांचा समावेश होता. पे ऑटेन्शन उपक्रमामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि या उपक्रमाने त्यांना ऑटिजम लवकरात लवकर ओळखू यावा आणि त्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करण्यासाठी सक्षम कसे बनवले हे देखील त्यांनी सांगितले. टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी यामध्ये भाग घेतला आणि संपूर्ण समाजाला याचा उपयोग व्हावा यासाठी कामाच्या ठिकाणी इतर सहयोग्यांना जागरूक केले.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अनुमानांनुसार भारतात १० मिलियनपेक्षा जास्त व्यक्ती ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डरने ग्रस्त आहेत. भारतामध्ये प्रत्येक शंभरावे मूल ऑटिजम स्पेक्ट्रमवर आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स, रिहॅबिलिटेशन व्यावसायिक, बालरोगतज्ञ, नियमित शाळांचे शिक्षक, मुलांच्या सुरुवातीच्या देखभालीतील व्यावसायिक आणि पॅराप्रोफेशनल्स, पालक, स्वयंसेवी संस्था तसेच मुख्य प्रवाहातील इतर सुविधा जसे की, प्रवास, सेवा पुरवठादार, रिटेल उद्योग यांनी देखील ऑटिजम व शिकण्यामधील इतर असक्षमता असलेल्या व्यक्तींसोबत संवाद साधण्याच्या समावेशक आणि सकारात्मक पद्धतींबद्दल पूर्णपणे जागरूक असणे खूप आवश्यक आहे.

एप्रिल २०२३ मध्ये टीपीसीडीटीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयांतर्गत वैधानिक संस्था रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहयोगाने जागतिक ऑटिजम जागरूकता दिनी 'ऑटिजम स्पेक्ट्रमवर लोकांचा समावेश करण्याबाबत सामूहिक दृष्टिकोन' या विषयावर एक सार्वजनिक वेबिनार आणि रिफ्रेशर ट्रेनिंगचे आयोजन केले होते. यामध्ये १००० पेक्षा जास्त विशेष शिक्षकांनी भाग घेऊन आरसीआय टेस्टिंग मार्गदर्शक सूचनांनुसार रिसर्टिफिकेशन पॉईंट्स देखील मिळवले. वेबिनारमधील वक्त्यांनी कम्युनिटी केयर मॉडेल्समधील नवीन प्रगतीबाबत तसेच संपूर्ण जगभरात चालवल्या जाणाऱ्या स्वयंसेवी गटांबाबत माहिती दिली, ऑटिजम स्पेक्ट्रममध्ये लोकांच्या समावेशासाठी तंत्रज्ञानातील चांगल्या पद्धतींवर प्रकाश टाकला.