डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी मुरारी जोशी यांचा सुपुत्र निषाद मुरारी जोशी हा एमबीबीएसच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून डॉक्टर झाला. कॉलेज मध्ये टॉप १० मध्ये तो झळकला आहे महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाल्याने त्याच्यावर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे
जुनी डोंबिवलीचे सुपुत्र निषाद जोशी याचे वडील मुरारी जोशी हे केडीएमसीत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी मोनिका जोशी ही देखील मागील वर्षी एमबीबीएस डॉक्टर झाली. त्यानंतर बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून निषाद देखील नुकताच डॉक्टर झाला. निषादचे याचे शालेय शिक्षण साऊथ इंडीयन विद्यालयात झाले. तर, महाविद्यालयीन शिक्षण मुलुंडच्या वझे केळकर विद्यालयातून झाले.
त्यानंतर त्याने 2018 मध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्याचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण होऊन खऱ्या अर्थाने तो डॉक्टर झाला असून एक वर्ष तिथेच इंटर्नशिप करणार आहे. एमडी मेडिसीन करण्याचा त्याचा मानस आहे.
---------