मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्य सरकारने आज (19 मार्च) सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश उशिरा जारी केले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर अश्वनि भिडे यांच्या जागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे. मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. वेलरासू यांची बदली करताना त्यांना नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
1. अश्विनी भिडे, एमडी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (रिक्त पदावर)
2. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, BMC
3. अंकित, सीईओ, झेडपी, बुलढाणा
4. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव
5. विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे
6. अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, बीएमसी
7. पी वेलरासू, (प्रतीक्षेत)
8. टीएमसी आयुक्त (कोणताही आदेश नाही)
९. संजय मीना, आयुक्त, एनएमआरडीए, नागपूर
10. मनोजकुमार सूर्यवंशी (प्रतीक्षेत)