मुंबई: देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकरांची नेमणूक ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याच्या समितीवर राहुल नार्वेकरांची निवड झाली आहे. या नेमणुकीवरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला. आम्ही त्यांचे वस्त्रहरण जनतेच्या न्यायालयात तर केले आहे. परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असेही ते म्हणाले.
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल, असा इशाराही ठाकरेंनी दिला.