महत्त्वपूर्ण बदल:
उज्जीवन एसएफबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इत्तिरा डेविस ह्यांनी म्हंटले, “12 महिन्यांच्या अवधीसाठी आमच्या फिक्स्ड डिपॉझिट व्याजामध्ये वाढ घोषित करताना आम्हांला आनंद होत आहे आणि उच्च दरांचा विस्तार अल्प मुदतीच्या डिपॉझिटची गरज असलेल्या आमह्या खातेदारांना लाभदायक ठरतील. रिटेल मास मार्केट बँक म्हणून आमच्या व्यापक डिपॉझिट बेसला वाढवण्यासाठीच्या आमच्या सर्व धोरणाला हे पूरक ठरेल.”
नियमित ग्राहक, एनआरओ आणि एनआरईसाठी नवीन दर 1 जून 2023 पासून लागू आहेत.
अ. क्र. | मुदतीची मर्यादा | प्रस्तावित व्याज दर | |
1 | 12 महिने | 6.50% | 8.25% |
प्लॅटिना एफडीवर 0.20% इतका अतिरिक्त व्याज दर मिळेल आणि ते फक्त रू. 15 लाख ते रू. 2 कोटींपर्यंतच्याच डिपॉझिटसाठी लागू असेल. प्लॅटीना हे नॉन- कॉलेबल आहे, म्हणजे ह्या योजनेमध्ये आंशिक आणि वेळेपूर्वी विड्रॉअल काढण्याची सुविधा नाही आहे.
उज्जीवन एसएफबीमध्ये मासिक, तिमाही आणि परिपक्वतेनंतर व्याज पे आउट पर्याय मान्य केले जातात. टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपॉझिटसमध्ये पाच वर्षे लॉक- इन अवधी असतो.
बँकेमध्ये असलेल्या एफडीजवरील दरांमधील वाढीचा हा अद्ययावत बदल केल्यामुळे टर्म डिपॉझिटसवर सर्वाधिक व्याज दर देणा-या बँकांमध्ये उज्जीवन एसएफबीने स्थान मिळवले आहे.