52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई दि. १४ - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार दि.१४ नोव्हेंबर रोजी दुपारी दिव्यांग बांधवांना मिठाई आणि रेशन किट वाटप करून दीपावली उत्सव साजरा केला.
बांद्रा पूर्व येथील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; घनश्याम चिरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.