जर अमेरिकेमध्ये तुम्ही टुरिस्ट व्हिसा किंवा बिझनेस व्हिसावर असाल, तर प्रवाशी नोकरीसाठी अर्ज करण्याची आणि मुलाखतींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. फेडरल एजन्सीने म्हटले आहे की, वैयक्तिकरित्या प्रवास करणारे लोक नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मात्र, नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्यांना व्हिसाचे स्टेटस बदलून घ्यावे लागेल. तसे न केल्यास त्यांची नोकरी जाऊ शकते.
युएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस एजन्सीने(USCIS) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेक लोकांनी त्यांना B1 आणि B2 व्हिसाच्या स्टेटवर नोकरीसाठी अर्ज करु शकतात का असे विचारले आहे, ज्याचे उत्तर होय आहे. हा व्हिसा तुम्हाला नवीन जॉब शोधण्यासाठी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास अनुमती देईल.
नोकरी सोडल्यानंतर, 60 दिवसांच्या आत देश सोडणे आवश्यक आहे.
यूएससीआयएसने म्हटले आहे की, ”जेव्हा बिगर स्थलांतरितांना काढून टाकले जाते तेव्हा बहुतेक लोकांना त्यांच्या पर्यायांची माहिती नसते. त्यांना ६० दिवसांत देश सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा परिस्थितीत ते टुरिस्ट व्हिसावर नोकरी शोधू शकतात. बिगर स्थलांतरितांसाठी हा मोठा दिलासा आहे.”