मुंबई : संपूर्ण भारतातील लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचे आवाहन करत वॉकरू या भारतातील अग्रगण्य फूटवेअर ब्रॅण्डने त्यांची नवीन मोहिम ‘वॉकइंडियावॉक’ सुरू केली आहे. कोइम्बतूर-स्थित स्वदेशी ब्रॅण्डचा दीर्घकाळापर्यंत मानसिक, शारीरिक व भावनिक आरोग्यासाठी देशभरात दररोज चालण्याच्या फायद्यांबाबत प्रबळ व प्रभावी जागरूकता निर्माण करण्याचा मनसुबा आहे.
फूटवेअर विभागातील लीडर म्हणून वॉकरूने ग्राहकांना, तसेच सर्व लोकांना फायदे देण्यासाठी यापूर्वी अनेक जागरूकता उपक्रम राबवले आहेत. ही अर्थपूर्ण गती पुढे देखील कायम ठेवण्याप्रती कटिबद्ध ब्रॅण्ड वॉकइंडियावॉक मोहिमेच्या माध्यमातून बैठेकाम करण्याच्या जीवनशैलीमुळै उद्भवण्याची शक्यता असलेल्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी दररोज चालण्याचे महत्त्व व भूमिकेबाबत अधिक जागरूकतेचा प्रसार करण्यास सज्ज आहे. ब्रॅण्डचे चॅनेल्स जसे सोशल मीडिया, प्रिंट, वेबसाइट, ई-मेल सिग्नेचर्स, व्हॉट्सअॅप क्रिएटिव्ह्ज यावरील तथ्ये व किस्स्यांच्या सिरीजच्या माध्यमातून वॉकइंडियावॉक देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
नुकेतच सुरू करण्यात आलेल्या मोहिमेबाबत आपले मत व्यक्त करत वॉकरूचे संचालक श्री. राजेश कुरियन म्हणाले, ‘‘आम्हाला आमची वॉकइंडियावॉक मोहिम सादर करण्याचा आनंद होत आहे. आमचा दृढ विश्वास आहे की, चालणे हा फक्त व्यायाम नसून आरोग्यदायी जीवनशैलीकरिता सर्वोत्तम सवय देखील आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आमच्या मोहिमेचा प्रत्येक भारतीयाला प्रेरित करण्याचा मनसुबा आहे आणि सर्वसमावेशक व माहितीपूर्ण पोस्ट्सच्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही चालण्याच्या फायद्यांबाबत रोचक तथ्ये, चालण्यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवलेल्या लोकांच्या प्रेरणादायी कथा आणि चालण्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याबाबतच्या टिप्स शेअर करू.’’
या मोहिमेचा भाग म्हणून वॉकरूने या भव्य राष्ट्रीय गतीशीलता चळवळीचा भाग होण्याकरिता लोकांसाठी उत्साहवर्धक सोशल मीडिया स्पर्धा #Walkindiawalk ची देखील घोषणा केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन वॉकरूकडून उत्साहवर्धक वाऊचर्स जिंकण्यासाठी व्यक्तींना फक्त त्यांच्या आवडत्या चालण्याच्या ठिकाणी स्वत:चा चालतानाचा सेल्फी घेण्याची किंवा १०के चॅलेंज पूर्ण करत त्याचा फोटो घेण्याची, तसेच ते फोटो सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड करून वॉकरू आणि #WalkIndiaWalk ला टॅग करावे लागेल.