मुंबईकरांनो पाणी जूपन वापरा, ३ व ४ जूनला पाणी कपात

Santosh Gaikwad May 30, 2024 05:50 PM

 मुंबई :  रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या प्राध्‍यापकांमार्फत ३ आणि ४ जून २०२४ रोजी मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ३ आणि ४ जून या कालावधीत कुलाबा/ए, चंदनवाडी/सी, ग्रँट रोड/डी, वरळी/जी दक्षिण आणि दादर/जी उत्‍तर विभागातील काही भागांतील पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे.


पालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जलाशयाच्या कामाचे पुनर्विलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या आधीच्या विशेषज्ञ समितीच्या अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी आणि मलबार टेकडी जलाशयातून मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा बाधित न करता जलाशयाच्या कामाची योग्य कार्यपद्धती सुचविण्यासाठी पालिकेतर्फे आयआयटीच्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामामुळे काही ठिकाणी पाण्‍याचा दाब कमी राहील. पाणीकपातीदरम्‍यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्‍यकता भासल्‍यास विभागवार पाण्‍याच्‍या वेळेत बदल करण्‍यात येईल, असे पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्‍यात आले आहे.


सोमवार ३ जून २०२४  कुलाबा/ए सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत कफ परेड व आंबेडकर नगर (पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५) पाणीपुरवठा बंद.
नरिमन पॉईंट व जी. डी. सोमाणी मार्ग (पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते दुपारी ३) पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात
मिलिटरी झोन (२४ तास पाणीपुरवठा ) (पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात)
चंदनवाडी/सी सकाळी ८ ते सकाळी १० मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात
ग्रँट रोड/डी सकाळी ८ ते सकाळी १० पेडर रोड पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १ ते रात्री १०.३०) पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात, दादर/जी उत्तर व वरळी/जी दक्षिण सकाळी ८ ते सकाळी १०
जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. 


मंगळवार दि ४ जून २०२४ रोजी कुलाबा/ए विभाग सकाळी ८ ते सकाळी १० मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात, चंदनवाडी/सी सकाळी ८ ते सकाळी १० मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात,  ग्रँट रोड/डी विभाग सकाळी ८ ते सकाळी १०. मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात, तर दादर/ जी उत्तर व वरळी/जी दक्षिण सकाळी ८ ते सकाळी १० जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली जाणार आहे,