अमरावती : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भात २० फेब्रुवारीला सुनावणी आहे. हाय कोर्टाने निकाल देत नवनीत राणा यांचे १४ प्रमाणपत्र हे बोगस आहे. सुप्रीम कोर्टात मात्र २० महिन्यापासून त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे. मुळात सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणा यांच्या निर्णयाबाबत उशीर (Amravati) का केला जात आहे? असा सवाल (Shivsena) शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे.
अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कि एकीकडे सुप्रीम कोर्ट आदेश देत आहे की १६ आमदारांचा निकाल तीन महिन्यात घेण्यात यावा. दुसरीकडे नवनीत राणांच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्ट २०-२० महिने लावत आहे. मलाही प्रश्न पडला आहे की सुप्रीम कोर्ट नेमकं कोणाच्या विचारावर चालत आहे; असा सवाल देखील उपस्थित केला.