वोक्हार्ट हॉस्पिटल आग्रीपाडा येथे नेफ्रोप्लस च्या सहकार्याने रुग्णांसाठी एचडीएफ तंत्रज्ञानाच्या Things माफक दरात डायलिसिस सुविधा

Santosh Sakpal December 18, 2024 05:51 PM


मुंबई,  : वोक्हार्ट हॉस्पिटल ने आग्रीपाडा येथे नेफ्रोप्लस च्या सहकार्याने रुग्णांसाठी हेमोडायाफिल्ट्रेशन (एचडीएफ)या तंत्रज्ञानाच्या मदतीने माफक दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली असून डायलिसिस उपचाराचा स्तर ऊंचावला आहे. 

वोक्हार्ट हॉस्पिटल मध्ये हेमोडायाफिल्ट्रेशन (एचडीएफ) तंत्रज्ञानाचे पदार्पण हे क्रांतिकारी डायालिसिस उपचार व सेवा देण्याच्या दिशेने एक लक्षणीय़ प्रगत पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असणारी एचडीएफ ही उपचार पध्दती शरीरातून मध्यम रेणू काढण्याच्या अधिक चांगल्या क्षमतेसाठी ओळखली जाते जे पारंपारिक डायलिसिस पध्दतीत परिणामकारकपणे काढले जात नाहीत. हे रेणू डायालिसिस संलग्न ॲमिलोइडॉसिस सारखे दीर्घकालीन-दु्ष्परिणाम करू शकतात असे आढळले आहे ज्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

एचडीएफचा उपयोग करणार्‍या रुग्णांना सुधारित चिकित्सीय परिणाम, अधिक चांगल्या प्रतीचे आयुष्य आणि द्रव निर्मूलनाशी संबंधित कमी समस्या यांपासून लाभ होतो. यामुळे सुधारित आणि अधिक सुरक्षित डायालिसिस उपचाराच्या शोधात असणार्‍या रुग्णांसाठी एचडीएफ तंत्रज्ञान हा आदर्श पर्याय बनतो. वोक्हार्ट हॉस्पिटल

मधील नेफ्रोप्लस चिकित्सालयात एक विशेष एचडीएफ मशीन उपलब्ध आहे जे रुग्ण आता माफक दरात वापरू शकतात आणि अधिक चांगल्या उपचाराचा लाभ घेऊ शकतात.

या नवीन उपचार पध्दतीवर बोलताना नेफ्रोप्लसचे चे विक्रम वुप्पला म्हणाले, ’ नेफ्रोप्लस मध्ये आम्ही रुग्णांना लाभ देणारे परिणाम थेट सुधारण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करून डायालिसिस शुश्रूषेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबध्द आहोत. हेमोडायाफिल्ट्रेशन (एचडीएफ) तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल, आग्रीपाडा  सोबतची आमची भागीदारी प्रगतीच्या दिशेने एक लक्षणीय आगेकूच आहे जे आमच्या रुग्णांना एक अधिक प्रगत, कार्यक्षम डायालिसिस अनुभव प्रदान करते. 

मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे लढा देत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा दर्जा पूर्ववत करणे हा आमचा प्रयत्न आहे. वोक्हार्ट मधील डायलिसिस उपचार कार्यक्रम सुरक्षितता आणि गुणवत्ता यांची हमी देण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो.एचडीएफ उपकरण प्रत्येक सत्रात अचूक उपचार देण्यासाठी नियमितपणे कॅलिब्रेट केले जाते.या उपचार पद्धतीमुळे रुग्णांच्या आरोग्यावर अधिक लाभकारक परिणाम होतात आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुधारतो.