52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड परिसरात एक २७ वर्षाची महिला बुडाल्याची घटना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे. ज्योती सोनार (२७ वर्ष) असं समुद्रात बुडालेल्या महिलेचे नाव आहे. मुंबई पोलिसांसह मुंबई महापालिकेचे जीवरक्षक यांनी महिलेचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.
काही पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी आले होते त्या पर्यटकांपैकी एक महिला समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला दगडावरून पाय घसरून समुद्रात पडल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस कंट्रोल रूमला 7.15 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली