मुंबई, जून : जागतिक पर्यावरण दिन साजरीकरण सुरू ठेवत टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाइल उत्पादक आणि ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज उपक्रम ‘इव्हॉल्व्ह’च्या सादरीकरणाची घोषणा केली. हा उपक्रम देशामध्ये ईव्ही अवलंबता वाढण्याप्रती संयुक्त प्रवासासाठी टाटा ईव्ही मालकांना एकत्र आणतो. ‘इव्हॉल्व्ह’मध्ये विविध ग्राहक केंद्रित उपक्रमांसह एक्स्पेरिएन्शियल मोहिमा, मोठ्या समुदायाला लाभ देण्यासाठी कृती योजना, प्रोग्राम्सचे एक्स्चेंज व अपग्रेड, तसेच विशेष रिफरल बेनीफिट्सचा समावेश असेल.
‘इव्हॉल्व्ह’च्या लाँचचे नेतृत्व करण्यासाठी टाटा मोटर्स आज या ग्राहक सहभाग उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू करत आहे, ज्यांची सुरूवात टप्प्याटप्प्याने मर्यादित कालावधीमधील रिफरल प्रोग्रामसह होत आहे. हा रिवॉर्ड प्लान ग्राहकांना टाटा ईव्ही कुटुंब वाढवण्याकरिता त्यांच्या पाठिंब्यासंदर्भात विशेष अनुभव निर्माण करण्यास प्रेरित करेल. टाटा ईव्ही समूहामध्ये मित्र व कुटुंबाची भर करण्यासह ग्राहकांना खात्रीदायी गिफ्ट्स जिंकण्याची संधी मिळेल, तसेच माचू पिछू, आइसलँड अशा नयनरम्य ठिकाणांसाठी क्यूरेटेड ट्रॅव्हल पॅकेजेस किंवा ग्रॅण्ड स्लॅम लाइव्ह पाहण्याची संधी असे लाभ मिळतील. हा विशेष सहभाग उपक्रम कंपनीसाठी अव्वल १३* ईव्ही ग्राहक बाजारपेठांमध्ये सुरू होणार आहे. ऑफरवरील रिवॉर्डसची सविस्तर माहिती https://ev.tatamotors.com/
‘इव्हॉल्व्ह’च्या लाँचबाबत आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, ‘‘भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी आहे, पण या मोहिमेला खरी चालना आमच्या ग्राहकांनी दिली आहे. कार्ससंदर्भात आमचे ग्राहक उत्कट असण्यासोबत पर्यावरणासाठी योगदान देण्याप्रती आणि प्रत्येकवेळी समुदायामध्ये वाढ करण्याप्रती केंद्रित देखील आहेत. हा सहभाग अधिक वाढवण्यासाठी आणि आम्हाला भारतातील पहिल्या क्रमांकाची ईव्ही उत्पादक बनण्यास मदत करण्याकरिता आमच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्सना पुरस्कारित करण्यासाठी ‘इव्हॉल्व्ह’ आमचा विस्तारित प्रयत्न आहे.
हा ग्राहक अनुकूल व सर्वसमावेशक उपक्रम आहे, ज्याचा अनेक अनुभव, चर्चा फोरम्स, लॉयल्टी पॉइण्ट्स, बेनीफिट्स देत आमच्या ईव्ही समुदायाचे केंद्र बनण्याचा मनसुबा आहे. मला आमच्या उद्देशांशी समानुपाती असलेल्या प्रसंगी ‘इव्हॉल्व्ह’च्या पहिल्या टप्प्याच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. या मर्यादित कालावधीतील रिफरल उपक्रमामध्ये अनेक विशेष ‘मनी काण्ट बाय’ प्रोत्साहनांचा समावेश आहे आणि तुम्हा प्रत्येकाला याचा अनुभव घेण्यास पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ईव्ही समर्थकांसाठी अद्वितीय सुविधांचा शोध घेण्याप्रती कार्यरत आहोत आणि आम्हाला आशा आहे की, हे प्रयत्न अधिकाधिक लोकांना #EvolveToElectric प्रती, तसेच हरित व शुद्ध भविष्य निर्माण करण्याप्रती प्रेरित करतील.’’
टाटा ईव्ही मालकांच्या समुदायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा अत्यंत प्रबळ समुदाय आहे, जो एकत्र त्यांच्या वेईकलचा आनंद घेतो. भारतातील चार-चाकी ईव्हींसाठी सर्वात मोठा पोर्टफोलिओ आणि अधिक पुढे जात विविध बॉडी स्टाइल्ससह विविध किंमतींमध्ये उत्साहवर्धक ईव्ही उत्पादने विकसित करण्याप्रती कटिबद्धतेसह टाटा मोटर्स आपल्या ईव्ही समुदायासाठी सर्वोत्तम सुविधा विकसित करण्याबाबत व योगदान देण्याबाबत दृढ आहे. उत्तमरित्या तयार केलेले उत्पादन संयोजन आणि प्रबळ ग्राहक-केंद्रित उपक्रमांसह टाटा मोटर्स ग्राहकांना सुलभ, किफायतशीर सोल्यूशन्स देण्याकरिता टाटा ग्रुप कंपनीजसोबत संपूर्ण ईव्ही इकोसिस्टम तयार करण्याच्या माध्यमातून देशामध्ये ईव्ही अवलंबतेला चालना देण्यामध्ये यशस्वी ठरली आहे. ‘इव्हॉल्व्ह’सह कंपनी या इकोसिस्टमच्या विकासाच्या दिशेने पुढील पाऊल उचलत आहे.
*रिफरल प्रोग्राम सुरू असलेली १३ शहरे आहेत - दिल्ली एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, कोची, जयपूर, तिरूवनंतपुरम, कोईम्बतूर, विशाखापटणम.