जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस : ठाणे सिव्हिल रुग्णालयात १३३ रुग्णांना केले आत्महत्येपासून प्रवृत्त !

Santosh Gaikwad September 09, 2024 03:27 PM

 
ठाणे : १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ठाणे सिव्हिल रुग्णालयात रुग्णांना समुदेशन केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षात १३३ रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त केले.

ठाण्यात सिव्हिल रुग्णालयात जाने ते डिसेंबर २०२२ मध्ये ३८ रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. यात पुरुष २५ आणि महिला १४ होत्या. जाने ते डिसेंबर २०२३ मध्ये ४९ रुग्णांचे समुपेशन करण्यात आले त्यात पुरुष २३ आणी स्त्री २६ जणांचा समावेश होता. जाने. ते ऑगस्ट २०२४ पर्यंत ४६ रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले.यामध्ये पुरुष१६ आणि स्री ३० रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्या पासून प्रवृत्त करण्यात आले.

ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रुग्णालयात येणाऱ्या ओपिडीतील रुग्णांना मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते. आत्महत्येचा वर्णन बदलणे अशी यंदाच्या वर्षाची थीम आहे. 

आत्महत्येचा विचार मनात येणारे रुग्ण, विषबाधित रुग्ण अशा अनेक रुगांचा समावेश असतो. आत्महत्येचा विचार मनात आलेल्या रुग्णाच्या मनातील नकारात्मकता समुदेशनाच्या माध्यमातून दूर केली जाते. कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. उघड्यावर पडतात. तसेच अनेकवेळा मेंदूतील रसायन बदलामुळे मनात नकारात्मक भावना येऊन आत्महत्येचा विचार येतो. त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार, ACS डॉ धिरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ञ डॉ विजय साळुंखे,  डॉ यशवंत सोलंकी, समाजसेवा अधीक्षक  श्रीरंग सिद, स्मिता भोसले, मनोरुग्णतज्ञ परिसेविका शर्मिला पठारे, मानसशास्त्रज्ञ जिनी पराणीहि टीम काम करीत आहे.