ZEE5 ने केली ‘वाळवी’ प्रीमियरची घोषणा
Narendra Wable
February 22, 2023 12:00 AM
ZEE5 ने केली ‘वाळवी’ या समीक्षकांनी नावाजलेल्या मराठी थ्रिलर-कॉमेडी फिल्मच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा
~ परेश मोकाशीद्वारे दिग्दर्शित फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे प्रमुख भूमिकांमध्ये, 24 फेब्रुवारी 2023पासून ही फिल्म ZEE5वरून स्ट्रीमिंगसाठी सज्ज ~
फेब्रुवारी 2023: ZEE5 या भारतातील सर्वांत मोठ्या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने, समीक्षकांनी नावाजलेल्या ‘वाळवी’ या मराठी फिल्मच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा केली आहे. पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 यांसारख्या ब्लॉकबस्टर मराठी फिल्म्स प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर ZEE5 आता 24 फेब्रुवारी रोजी ‘वाळवी’चा प्रीमियर करण्यास सज्ज आहे. परेश मोकाशीने दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
ZEE स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांची निर्मिती असलेली वाळवी ही फिल्म तिकीट खिडकीवर यशस्वी ठरली आहे. अवनी (अनिता दाते-केळकर) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) हे दोघे एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात अशा दृश्यापासून फिल्म सुरू होते. आर्थिक समस्यांहून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आणि त्यांच्यासमोर आत्महत्या हाच सर्वोत्तम उपाय आहे असे त्यांना ठामपणे वाटत असते. मात्र, प्रत्यक्षात ही आत्महत्या नसून खुनाचा प्रयत्न आहे आणि त्याचे सूत्रधार अनिकेत व त्याची प्रेयसी देविका (शिवानी सुर्वे) आहेत हे नंतर समोर येते. अनिकेतच्या कटकट्या बायकोपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे कारस्थान रचलेले असते. शिवाय आणखी एक गूढ मनुष्य (सुबोध भावे) काहीतरी छुपा हेतू घेऊन असतो. आता कटाच्या मुख्य दिवशी नेमके काय घडते हेच या फिल्ममध्ये दाखवले आहे.
8.8 एवढे आयएमडीबी रेटिंग असलेली वाळवी ही सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेली मराठी फिल्म आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली. अनन्यसाधारण पटकथा, अनपेक्षित धक्के व वळणे आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे ही फिल्म प्रेक्षक व समीक्षक दोहोंच्या पसंतीस उतरली. 24 फेब्रुवारीला ZEE5वर जागतिक डिजिटल प्रीमियर झाल्यामुळे ही फिल्म 190हून अधिक देशांतील प्रेक्षकांना उपलब्ध होईल.
ZEE5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, “मराठी ही ZEE5 परिसंस्थेतील महत्त्वाची भाषा आहे आणि प्रेक्षकांना सर्वोत्तम दर्जाचा मराठी भाषेतील काँटेण्ट देऊन खुश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पांडू, झोंबिवली आणि टाइमपास 3 या फिल्म्सच्या यशानंतर समीक्षकांनी नावाजलेली आणखी एक फिल्म वाळवी प्लॅटफॉर्मवर आणताना आम्हाला आनंद होत आहे. 8.8 एवढे आयएमडीबी रेटिंग असलेली थ्रिलर कॉमेडी वाळवी वेगवान, मजेशीर व खिळवून ठेवणारी आहे. ही फिल्म बघताना प्रेक्षकांचा श्वास कायम रोखलेला राहतो. सर्वांना ही अनोखी गोष्ट नक्कीच आवडेल अशी खात्री आम्हाला वाटते.”
दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाला, “वाळवी ही एक चाकोरीबाह्य डार्क थ्रिलर कॉमेडी आहे आणि आत्तापर्यंत हा प्रकार मराठी सिनेमात विस्तृतपणे हाताळला गेलेला नाही. समीक्षक आणि चाहत्यांनी दोघांनीही दिलेल्या सारख्याच प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. आमचा वेगळा प्रयत्न त्यांना आवडला आहे आणि त्यांनी दादही दिली आहे. आता वाळवीचा ZEE5वर जागतिक डिजिटल प्रीमियर होत असल्यामुळे दुसऱ्या खेळीत ही फिल्म कशी कामगिरी करते याबद्दल मी उत्सुक आहे. ज्यांनी आत्तापर्यंत ही फिल्म बघितलेली नाही त्यांना मी ग्वाही देऊ शकतो की, ही फिल्म त्यांना आश्चर्यचकीत करेल, त्यांचे मनोरंजन करेल आणि सातत्याने येणाऱ्या धक्क्यांच्या व वळणांच्या माध्यमातून त्यांना खिळवून ठेवेल.”
अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, “वाळवीतील भूमिका माझ्यासाठी प्रायोगिक स्वरूपाची होती. मी या प्रकारची भूमिका पूर्वी केलेली नव्हती आणि तिला जो प्रतिसाद मिळाला त्याचा मला खरोखरच आनंद वाटतो. माझ्या दिग्दर्शकाने (परेशम) मला अभिनेता म्हणून माझ्या कक्षा रुंदावण्यात मदत केली. त्याने मला माझ्या ‘कंफर्ट झोन’बाहेर ओढले, याबद्दल मी कृतज्ञ आहे. या फिल्मची प्रशंसा केल्याबद्दल आणि फिल्मवर प्रेम केल्याबद्दल मी प्रेक्षकांचाही ऋणी आहे. आता वाळवीचा जागतिक डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होत असल्यामुळे जगभरातील व्यापक प्रेक्षकवर्गापुढे फिल्म पोहोचणार आहे. ही एक उत्तम लिहिलेली, धक्के देणारी ब्लॅक कॉमेडी आहे तसेच प्रेमातून घडणाऱ्या गुन्ह्यांकडे यात उपहासगर्भ दृष्टिकोनातून बघितले आहे. त्यामुळे लोकांनी या फिल्मकडे नमुना म्हणून बघावे असे मी म्हणेन.”
24 फेब्रुवारी 2023पासून बघा ‘वाळवी’ केवळ ZEE5वर!