जे टीका करतात त्यांनी एक तरी पाण्याची बॉटल मदत केली का खासदार नरेश मस्के यांचा सवाल
Santosh Sakpal
April 24, 2025 06:23 PM
मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
जे पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यांना शेवटी मदत मिळणे महत्त्वाचे आहे. विरोधकांच्या टीका केली आहे, परंतु टीका करण्याची आणि राजकारण करण्याची ही योग्य वेळ नाही. सरकारकडून मदत ही मिळत आहे. पण सरकारकडून मदत मिळत असताना एकनाथ शिंदें यांच्या पक्षाकडूनही मदत होत आहे. कारण जेव्हा इर्शालवाडीमध्ये दुर्घटना घडली होती. तेव्हाही घटनास्थळी गेले होते. एकंदरीत काय तर मदत करण्याचा स्वभाव एकनाथ शिंदेंचा आहे. त्यामुळे महायुतीत कुठेही मतभेद किंवा वाद नाहीत. जी घटना घडलेली आहे, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तिकडे मदत करतोय. जे टीका करताहेत, त्यांनी एक तरी पाण्याची बॉटल तिकडे नेऊन दिली का?, किंवा त्यांचे नेते जे परदेशात थंड हवेच्या ठिकाणी गेलेत, त्यांनी याच्यावर एक वक्तव्य तरी केलं आहे का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. देशांमध्ये हल्ल्याबाबत संताप असताना विरोधक मात्र तिकडे कोण गेले यावरुन टीका करताहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. आमच्या महायुतीत श्रेयवाद किंवा कुरघोडीचे अजिबात राजकारण नाही. तसेच यापुढे देखील आम्ही मदत करत राहणार असून मदत करणे हा आमचा आणि आमच्या पक्षाचा स्वभावच आहे. कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः एक शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकातील शिवसैनिक हा नेहमी जागा असतो. अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.