गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये चुरस
Santosh Sakpal
September 12, 2024 03:57 PM
मुंबई:
गणाधीश चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबईतील शालेय-कॉलेजमधील नामवंत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये १३ सप्टेंबर रोजी चुरस असेल. बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा काळाचौकी येथे रंगणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ८ आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिन्मय दरेकर वि. शंतनू पोटे यामधील सलामी लढतीने होणार आहे.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील ध्रुव भालेराव, समीर खान, पृथ्वी बांदेकर, चैतन्य दरेकर, पुष्कर गोळे, कौस्तुभ जागुष्टे, शुभम यादव, अहमद शाह, कुणाल जाधव, केविन अडसूळ, निखील कांबळे, सिद्धांत मोरे आदी ज्युनियर खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चँम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी लायन्स डॉ. जगन्नाथराव हेगडे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमी दिलीप वरेकर, स्वप्निल शिंगे, रवींद्र गोनबरे, सिद्धेश ढोलम, शुभ्रतो वरेकर, ऋषिकेश शेडगे आदी विशेष कार्यरत आहेत. प्रमुख पंचाचे कामकाज प्रणेश पवार व चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत.
**************************