बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडांच्या शुभारंभातून बजाज फिनसर्व्हचा रिटेल क्षमता विस्तार
Santosh Sakpal
June 07, 2023 12:46 PM
• बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड आता सात फंड बाजारात आणू शकणार: लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, ओव्हरनाइट फंड, आर्बिट्रेज फंड, लार्ज आणि मिड-कॅप फंड, बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड
• गुंतवणुकीची पध्दत (इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी) आणि तंत्रज्ञान-सक्षम दृष्टीकोनातून कंपनीच्या वेगळेपणाचे प्रकटीकरण
मुंबई/पुणे, 6 जून, 2023: भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-आधारित वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या बजाज फिनसर्व्ह लिमिटेडने आज बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड अंतर्गत त्यांच्या नवीन म्युच्युअल फंड व्यवसायाची सुरूवात करत असल्याची महत्वपुर्ण घोषणा केली. म्युच्युअल फंड व्यवसायाच्या माद्यमातून गुंतवणूकदारांसाठी रिटेल आर्थिक साधनांचा संच आणखी सक्षम केला जाणार आहे.
बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड किरकोळ (रिटेल), उच्च उत्पन्नधारक (एचएनआय) ते संस्था अशा विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फिक्स्ड इन्कम, हायब्रीड आणि समभाग अशा श्रेणींमध्ये गुंतवणूक साधनांचा एक व्यापक संच आणणार आहे. प्रारंभीच्या काळात कंपन्या आणि त्यांच्या ट्रेझरी विभागाची (कोषागार विभाग) गुंतवणूक पूर्तता करण्यासाठी फिक्स्ड इन्कम, लिक्वीड(तरल), ओव्हरनाईट आणि मनी मार्केटसारख्या गुंतवणूक साधनांचा संच बाजारात आणला जाणार आहे.
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज म्हणाले, “ भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आमच्याशी आधीच गुंतवणूकीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ग्राहकांशी सखोल, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही आर्थिक पर्यायांचा पूर्ण संच प्रदान करण्याबाबत वचनबद्ध आहोत. मालमत्ता व्यवस्थापनाचा शुभारंभ आमच्या रिटेल फ्रँचायझीमध्ये विविधता आणण्यास मदत करतो आणि व्यापक ग्राहकसंख्येच्या आधारावर आर्थिक सेवांमध्ये समूहाच्या एकत्रित ताकदीचा लाभ उठवतो.”
तंत्रज्ञान आणि विश्लेषण हे बजाज फिनसर्व्हच्या व्यवसायांचे आधारस्तंभ आहेत आणि ते केवळ सक्षम करणारेच नव्हेत तर वेगळेपण प्रकट करणारे देखील आहेत. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड आपल्या चमूला सक्षम करण्यासाठी, वितरकांसाठी मंच तयार करण्यासाठी, गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दीर्घकालीन शाश्वत मूल्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायातून बजाज फिनसर्व्हसाठी वाढीचा एक नवीन रोमांचक अध्याय सुरु केला आहे, असा आमचा विश्वास असल्याची टिप्पणी त्यांनी याप्रसंगी केली.
बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोहन म्हणाले, ज्या मूलभूत आधारांवर बजाज फिनसर्व्ह समूह बांधला गेला आहे त्या डेटा आणि टेक प्लॅटफॉर्मच्या वापराद्वारे बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाची रणनीती नावीन्यपूर्णता, लाभदायक भागीदारी आणि भविष्यासाठी व्यवसायाचे तयार प्रारुप (मॉडेल) या घटकांवर आधारित आहे.”
"आमचे प्राथमिक वेगळेपण हे आमचे गुंतवणूक तत्वज्ञान आहे. आम्ही अल्फाच्या सर्व स्त्रोतांना, म्हणजे माहिती, परिमाणवाचकता तसेच वर्तणुकीचे अंग हे सर्व एका चौकटीमध्ये एकत्रित करण्याचा विचार करतो, ज्याला आपण ‘INQUBE’ असे म्हणतो. विविध उद्योगातील तज्ञ आणि बजाज फिनसर्व्ह ग्रुपमधील विशेष तज्ञांचा समावेश असलेली आमची टीम आम्हाला उद्योगातील सखोल माहिती तसेच समूहाची संस्कृती आणि आंतरिक रचना यांचा लाभ घेण्यास सक्षम करते,” असेही मोहन यांनी स्पष्ट केले.
बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाने आपल्या पहिल्या सात योजना सेबीकडे दाखल केल्या होत्या. या योजनांत लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, ओव्हरनाइट फंड, आर्बिट्रेज फंड, लार्ज आणि मिड-कॅप फंड, बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड यांचा समावेश होता. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड हे गुंतवणूक प्रकार पुढील ३० दिवसांत बाजारात आणण्यास सुरुवात करेल आणि ज्याचा शुभारंभ फिक्स्ड इन्कम प्रकारापासून होईल. आमच्या गुंतवणूक तज्ज्ञांच्या चमूद्वारे बड्या बाजार श्रेणींपेक्षा बाजारातील संधी आणि शाश्वत अल्फा निर्माण करण्याच्या शक्यतांच्या आधारे भविष्यातील गुंतवणूक साधनांचा रोडमॅप निश्चित केला जाईल, असे मोहन म्हणाले.
मार्च 2023 मध्ये बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड अंतर्गत बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (BFAML) ला गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून म्युच्युअल फंडाचे कामकाज सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून बजाज फिनसर्व्हला अंतिम नोंदणी परवानगी लाभली.
बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाची कार्यपध्दती बजाज फिनसर्व्हमधील उद्योजकीय संस्कृती, नवकल्पना, अंमलबजावणीच्या बाबतीत कठोरता, सक्षम जोखीम व्यवस्थापन आणि दीर्घकालीन शाश्वत वाढ या घटकांशी तंतोतंत जुळते.
कंपनीच्या गुंतवणूक चमूचे नेतृत्व मुख्य गुंतवणूक अधिकारी निमेश चंदन हे करत आहेत. त्यांचा भारतीय भांडवली बाजारात गुंतवणुकीबाबत २२ वर्षांचा अनुभव आहे.
बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाच्या नेतृत्व चमूत अनिरुद्ध चौधरी (प्रमुख - रिटेल आणि संस्थात्मक व्यवसाय), नीलेश चोणकर (प्रमुख - संचालन आणि वित्त), हरीश अय्यर (प्रमुख - विधी आणि अनुपालन), रॉयस्टन नेट्टो (प्रमुख - विपणन आणि डिजिटल व्यवसाय), निरंजन वैद्य (प्रमुख – आयटी) आणि वैभव दाते (प्रमुख – मानव संसाधन) या तज्ज्ञांचा समावेश आहे.
बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड बजाज ब्रँडचा फायदा घेईल, जो जवळजवळ शतकापासून भारतासाठी उच्च-गुणवत्तेची उत्पादने वितरित करण्यासाठी ओळखला जातो.
गत 16 वर्षांहून अधिक काळ बजाज फिनसर्व्ह समुहाने वैयक्तिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बचतीची साधने, ग्राहक व व्यावसायिक कर्जे, गहाण, ऑटो फायनान्सिंग, सिक्युरिटीज ब्रोकरेज सेवा, सामान्य आणि जीवन विमा आणि गुंतवणूक यांसारख्या उपायांद्वारे आर्थिक लवचिकता निर्माण करण्यात धोरणात्मक कौशल्यता प्राप्त केली आहे.
बजाज फिनसर्व्ह देशात 4,500 ठिकाणी 10 कोटी ग्राहकांना डिजिटल आणि प्रत्यक्ष त्यांच्यापर्यत पोहोचून सेवा पुरवत आहे. बजाज समूह आपल्या सामाजिक प्रभाव उपक्रमांद्वारे आतापर्यंत वीस लाख नागरिकांपर्यंत पोहचलेला आहे.