रनआऊटची हॅटट्रिक अन् मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर थरारक विजय! पलटनने असा पलटवला सामना

Santosh Sakpal April 13, 2025 11:17 PM

दिल्ली : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मधील मोठ्या थरारक विजयाची नोंद केली. १९व्या षटकातील अखेरच्या ३ चेंडूवर ३ विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत थरारक विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयी घोडदौडीला पूर्णविराम लावला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या मोसमातील पहिला पराभव पत्करावा लागला आहे.

चॅम्पियन मुंबई इंडियन्ससमोर आजवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कधीच २०० अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही आणि मुंबईने हा विक्रम कायम ठेवला. मुंबई इंडियन्सच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात गडबडली आणि दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण यानंतर करूण नायर आणि अभिषेक नायर यांनी वादळी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.