मुंबई मेगा टॅलेंट हंट प्रर्दशित

SANTOSH SAKPAL April 19, 2023 06:48 PM

समुदायांना प्रेरित करणारा एम्‍पायर सेंट्रमचा मुंबई मेगा टॅलेंट उपक्रमाचा कलेला समुदाय सक्षमीकरणासाठी संसाधन बनवण्‍याचा संकल्‍प

मुंबई, : जागतिक कला दिनानिमित्त एम्‍पायर सेंट्रम (ईसी) या अंबरनाथमधील अद्वितीय टाऊनशिपने प्रदेशामधील तरूण, उदयोन्‍मुख आर्टिस्‍ट्सना प्रकाशझोतात आणण्‍यासोबत त्‍यांना निपुण करण्‍याचा मनसुबा असलेला त्‍यांचा सीएसआर उपक्रम – मुंबई मेगा टॅलेंट हंट लॉन्‍च केला. मेगा टॅलेंट हंट हे व्‍यासपीठ आहे, जे तरूण टॅलेंट्सना त्‍यांची कला व सर्जनशीलता दाखवण्‍यास प्रेरित करते आणि त्‍यांना मान्‍यता व व्‍यापक प्रेक्षकांसमोर त्‍यांची कला दाखवण्‍याची संधी देते.

टॅलेंट हंट सर्व तरूण आर्टिस्‍ट्ससाठी खुले होते. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून एम्‍पायर सेंट्रम सर्जनशीलता व नवोन्‍मेष्‍काराच्‍या संस्‍कृतीला चालना देत कला समुदायाला पाठिंबा व चालना देण्‍याची आशा करते.  

याप्रसंगी बोलताना एम्‍पायर सेंट्रमचे (एम्‍पायर इंडस्‍ट्रीज लि. ची ए डिव्हिजन) मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संचालक अनुप भार्गव म्‍हणाले, ‘‘सामाजिकदृष्‍ट्या जबाबदार संस्‍था म्‍हणून एम्‍पायर सेंट्रमचा प्रेरित करण्‍यासोबत जगामध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍यासाठी कलेच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे. जागतिक कला दिन हा कलेचे महत्त्व आणि समाजावर कलेच्‍या प्रभावाला दाखवण्‍याचा योग्‍य क्षण आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सकारात्‍मक परिणाम निर्माण करण्‍याची आणि मोठ्या प्रमाणात समुदायाच्‍या सुधारणेप्रती योगदान देण्‍याची आशा करतो.’’ 

एम्‍पायर सेंट्रमच्‍या सेलिब्रेशन्‍समध्‍ये अनेक कार्यक्रमांचा समावेश होता, जसे लहान मुलांसाठी टॅलेंट हंट आणि त्‍यांच्‍या पालकांसाठी लकी ड्रॉ. इव्‍हेण्‍टमध्‍ये ५ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांनी विविध स्‍पर्धांमध्‍ये (गायन, नृत्‍य, ओपन माइक आणि आर्ट अॅण्‍ड क्राफ्ट) सहभाग घेतला. सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘शोकेस युअर रिअल टॅलेंट ऑन द स्‍टेज ऑफ अंबरनाथ’ नृत्‍य स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. ऑडिशन आणि फिनालेसाठी नृत्यदिग्दर्शक राजीव उज्जैनवाल जज म्हणून उपस्थित होते. फिनालेच्या दिवशी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन – ९’मधील डिमॉलिशन क्रू या टीमला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.  

तसेच सहभागी मुलांच्या पालकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना टाउनशिपमध्ये त्यांच्या स्वप्नातील घर बुक करण्यासाठी सवलत आणि पसंतीची ठिकाणे यांसह इतर ऑफर मिळत होत्या. कंपनीने सर्व सहभागींना प्रकल्पाचे प्रमाण आणि देत असलेल्या सुविधांची ओळख करून देण्यासाठी संपूर्ण साइट भेट देण्याची ऑफर दिली. एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

भार्गव पुढे म्‍हणाले, ‘‘या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्ही आमच्या प्रकल्पातील मुलांना व कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या नवीन घराची रोचक कथा साजरी करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. नवीन घराची कथा तयार करण्यास मदत करण्यासाठी कलेचा वापर करून मुले आणि कुटुंबातील सदस्य त्यांची सर्जनशीलता व कल्पनाशक्ती व्‍यक्‍त करण्‍यासोबत त्यांच्या भविष्यातील घरासाठी समान दृष्‍टीकोन देखील तयार करू शकतात.’’

निसर्गाच्या सान्निध्‍यात वसलेल्या ३५ एकर बहुआयामी टाउनशिपमध्‍ये ३.५ एकर नयनरम्‍य गार्डनसह प्रशस्त व कुशलतेसह डिझाइन केलेल्या १ बीएचके व २ बीएचके सदनिका आहेत. टाऊनशिपमध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा, अॅम्फीथिएटर, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट आणि खुली व्यायामशाळा यांसारख्या इतर अत्‍याधुनिक सुविधा देखील आहेत. टाऊनशिपमधील रूफटॉप क्षेत्रामध्‍ये इन्फिनिटी पूल, सनसेट लाउंज, मीडिया लाउंज, गेमिंग झोन, लायब्ररी आणि बिझनेस सेंटर आहे.