कॅप्री लोन्स’च्या वतीने भारतीय वाहन बाजारपेठेत डिजीटल ट्रान्सफॉर्मेशनचा मार्ग मोकळा करत कारलेलो’ मधील 51% भाग-भांडवल खरेदी

Santosh Sakpal June 04, 2023 04:09 PM

 

  • 150 कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक
  • गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 60,000 चारचाकी कर्जे मिळविली

 

मुंबई,: कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (सीजीएचएल)कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड’साठी होल्डिंग कंपनी – कॅप्री लोन्स या ब्रँड नावासह एक प्रमुख बँकिंग-तर वित्तीय कंपनीच्या वतीने भारतातील आघाडीचा ऑनलाइन नवीन चारचाकी विक्री मंच कारलेलोमधील 51% भागभांडवल विकत घेऊन तिचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार केला. 150 कोटी रुपयांची ही धोरणात्मक गुंतवणूकडिजीटल ट्रान्सफॉर्मेशन घडविताना आणि ग्राहक अनुभव वाढवताना भारतीय चारचाकी वित्तीय बाजारपेठेत कॅप्री लोन्सचे स्थान अधिक मजबूत करते.

 

कॅप्री लोन्स हा कार कर्ज उद्योगातील पहिल्या क्रमांकाचा नवीन कार लोन अॅग्रीगेटर आहेज्याने गेल्या आर्थिक वर्षातच तब्बल 60,000 चारचाकी कर्जे मिळविली आहेत. वित्तीय सेवा उद्योगातील ही एक प्रमुख कंपनी असूनकॅप्री लोन्सने ऑनलाइन नवीन कार फायनान्सिंग विभागातील प्रचंड क्षमता ओळखली आहे. हे भांडवल संपादन म्हणजे ग्राहकांच्या सोयीसाठी कॅप्री लोन्सची बांधिलकी आणि देशभरातील चारचाकी कर्ज ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठीची कार्यतत्परता दृढ करण्याच्या दिशेने एक नैसर्गिक प्रगती आहे.

 

कंपनीच्या ग्राहक-केंद्री दृष्टिकोनावर आणि या संपादनावर जोर देतानाकॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापकश्री राजेश शर्मा म्हणाले, "कॅप्री लोन्समध्येग्राहकांची सोय ही आमच्या कामकाज्याच्या केंद्रस्थानी आहे. ही गुंतवणूक आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. सध्याच्या बाजारपेठेतील आव्हानांवर मात करण्यासाठी नवीन-युगातील तंत्रज्ञान उद्योजकांना सक्षम बनवताना ऑनलाइन नवीन कार विक्री आणि वित्तपुरवठा बाजाराच्या वाढीला चालना देण्यासाठी कारलेलोसह आमच्या भागीदारीद्वारेदेशभरातील ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्याच आमचे ध्येय आहे. कॅप्री लोन्स ग्राहकांसाठी वित्तपुरवठा आणि उद्योगात अत्याधुनिक उपायांना पुढे नेण्याच्या दृष्टीने सोयींना प्राधान्य देतानावाढत्या ऑनलाइन नवीन कार विक्री बाजाराच्या विस्ताराला चालना देण्याची संधी म्हणून या गुंतवणुकीला मान्यता देते."

 

भांडवलाच्या या ताज्या ओघाच्या आधारावर कारलेलो आपली उपस्थितीसेवा आणि तंत्रज्ञान सुधारेल, ज्याचा उपयोग नवीन ग्राहक मिळविण्यासाठी केला जाईल. कारलेलो’च्या वतीने प्रदान करण्यात येत असलेल्या भक्कम सेवा विद्यमान ग्राहकांशी संबंध सुधारण्यासाठी देखील कार्य करतील. कारलेलोकडे सध्या भारतातील 34 शहरांमध्ये 1,200 सहयोगी आहेत. जे नियमितपणे ग्राहकांशी संवाद साधतातत्यांना त्यांच्या सर्व नवीन वाहन-संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी एंड-टू-एंड सेवा देतात. याशिवायग्राहकांचा डिजीटल खरेदी-विक्रीचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी देशातील 8,000+ अधिकृत विक्री देखील हाताळेल. आगामी काळात ऑनलाइन नवीन कार विक्रीतील नावीन्यपूर्ण कारलेलो’चा दरमहा सुमारे 7,000 ते 8,000 कार विकण्याचा मानस आहेज्यामुळे ग्राहकांना विना-त्रास कार खरेदीचा अनुभव मिळू शकेल. ऑनलाइन मंच 32 ब्रँड265 मॉडेल आणि 1,700 प्रकारांचा कॅटलॉग देखील उपलब्ध करतो.

कारलेलोचे दूरदर्शी सीईओ गौरव अग्रवालकॅप्री लोन्ससोबतच्या भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त करताना म्हणाले"कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रा. लि.ची गुंतवणूक नवीन कार विक्री आणि खरेदी अनुभवात क्रांती घडविण्यात कारलेलोच्या दृष्टीकोनाचे उत्कृष्ट प्रमाणीकरण पटविते. आजची पिढी तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुजाण असून ऑनलाइन वाहन विक्री बाजारपेठेत अभूतपूर्व बदल घडवून आणत आहे. डिजीटल विक्रीचे वाढते महत्त्व आणि आगामी दोन वर्षांत 80% बाजारपेठेतील वाट्यात अपेक्षित वाढइंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या जलद प्रवेशामुळेतसेच उच्च-मूल्याच्या वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांच्या भावना बदलल्यामुळेया गुंतवणुकीमुळे आमच्या सेवा वाढवण्याच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन अखंड वाहन हस्तांतरण सुलभ करण्यासाठी आमच्या प्रयत्नांना चालना मिळेल. डिजीटल चारचाकी विक्री क्षेत्र एक अप्रयुक्त आणि मुबलक बाजारपेठ संधीचे प्रतिनिधित्व करते. तसेच कारलेलो आणि कॅप्री लोन्स एकत्रितपणे या डोमेनमध्ये नवीन मर्यादा निर्माण करू शकतात.

आजचे ग्राहक नवीन चारचाकी खरेदी करताना सुविधापारदर्शकता आणि स्पर्धात्मक किंमतीला प्राधान्य देतात हे कॅप्री लोन्स जाणते. कारलेलोच्या वापरकर्त्यासाठी अनुकूल मंचासहग्राहक अगदी सहजपणे वेगवेगळ्या कार मॉडेल्सचे संशोधन आणि तुलना करू शकतातकिंमतीचे अंदाजपत्रक आणि कर्ज पर्याय मिळवू शकतात. ऑनलाइन टेस्ट ड्राइव्ह बुक करू शकतात.