महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व विश्वाला मानवता शिकवणारे नेतृत्व, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
Ketan khedekar
April 25, 2025 06:45 PM
मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान देऊन समतेची क्रांती केली.भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारून अहिंसा आणि शांतता शिकविणारी धम्मक्रांती केली.त्यांचे विचार केवळ भारत देशाला घडविणारे असून संपूर्ण विश्वाला मानवता शिकविणारे महान नेतृत्व म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.या भीम जयंती उत्सवाला संपूर्ण हरयाणातून हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष रवी सोनू कुंडली उपस्थित होते.
देशात समता आणि एकता नांदावी यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले योगदान दिले आहे.त्यांच्या अथक प्रयत्न आणि कष्टामुळे संपूर्ण दलित आदिवासी बहुजन समाज घडला.संपूर्ण देश घडला आहे.सर्व जाती धर्मियांचा कल्याणचा विचार अखिल मानवतेचा विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होता.त्यांचे स्थान आमच्या काळजात आहे.संपूर्ण विश्व ज्ञानसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर नतमस्तक झाले आहे.त्यांचा आदर्श घेऊन मी काम करीत घडलो.डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी दिल्लीच्या तख्ता पर्यंत पोहोचू शकलो अशी कृतज्ञ भावना ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 28 भारतीय पर्यटकंवर भ्याड नापाक हल्ला करणाऱ्या पाकधार्जिण्या अतिरेक्यांचा नायनाट केला पाहिजे.पाकिस्तानला कायमच धडा शिकवला पाहिजे.पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेऊन वेळ आली तर पाकिस्तान shi युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पहलगाम मध्ये मृत्युमुखी पडलेल्या 28 भारतीय पर्यटकांना यावेळी ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण वाहिली.
कलम 370 हटवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकवला आहे.जम्मू काश्मीर मध्ये उद्योग व्यापार आणि पर्यटन वाढले आहे.3 करोड पर्यटकांनी अलीकडची काळात जम्मू काश्मीर ला भेट दिली आहे. आतंकवादाची दहशत संपविण्यात आली होती.मात्र पहलगाम मधील हल्ला हा अतिरेक्यांचा जम्मू काश्मीर मध्ये शांतता बिघडविण्याचा नापाक इरादा होता. आता असा धोका पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेऊ. पाकड्यांना धडा शिकवू. पाकधार्जिन्या अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवून पहलगाम मधील मृतांना खरी श्रद्धांजली वाहूया आक्रमक भूमिका ना.रामदास आठवले यांनी मांडली.