सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मुलांना इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी डीवाय पाटील स्टेडियममध्ये क्रिकेट दिग्गजांसोबत मैदानावर उतरण्याची संधी

Santosh Sakpal February 25, 2025 11:10 PM

सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मुलांना इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी डीवाय पाटील स्टेडियममध्ये क्रिकेट दिग्गजांसोबत मैदानावर उतरण्याची संधी

सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या (एसटीएफ) 'स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट' या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेटच्या दिग्गजांना अॅक्शनमध्ये पाहण्याची अनोखी संधी मिळाली.

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भारत मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघांसोबत ही मुले मैदानावर उतरली आणि राष्ट्रगीताचे सूर उमटत असताना सचिन तेंडुलकरच्या शेजारी उभी राहिली, त्यावेळी त्यांना वाटणारा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.