52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
नवी दिल्ली : भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
कांदा प्रश्नी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कांद्यावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार लवकरात लवकर कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय घेईल, अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.