जेष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंदडा यांची स्वामी रामदेव बाबांशी भेट: शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा
Santosh Gaikwad
July 18, 2024 02:38 PM
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), १८-जुलै: विक्रांद टाइम्स/अग्रसेन टाइम्सचे मुख्य संपादक अरुणकुमार मुंदडा यांनी दिनांक १७ जुलै रोजी हरिद्वार स्थित पंतजली योग पीठास भेट देऊन योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान, पंतजली योग पीठाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे काही शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुंदडा यांनी स्वामी रामदेव बाबा यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याची शक्यता विचारली. या चर्चेदरम्यान, मुंदडा यांनी पतंजली योग पीठासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामी रामदेव बाबा यांनी पंतजली योग पीठाच्या विविध उपक्रमांची आणि त्याच्या कार्यप्रणालीची सखोल माहिती मुंदडा यांना दिली.
मुंदडा यांनी सांगितले, "सदरची भेट हि सदिच्छा भेट होती. दिल्लीला कामानिमित्त येताना मी नेहमी हरिद्वारला येऊन बाबांचे दर्शन घेतो." मुंदडा यांनी पंतजली योग पीठाच्या अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सेवांबद्दल प्रशंसा व्यक्त केली आणि त्यांच्या योगदानाला सलाम केला.
स्वामी रामदेव बाबा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत छत्रपती संभाजीनगरमध्ये योग शिक्षण, आयुर्वेद आणि इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकेल आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
पंतजली योग पीठ आणि अरुणकुमार मुंदडा यांच्यातील या चर्चेमुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.