टाटा मोटर्सला विजयानंद ट्रॅव्‍हल्‍सकडून मिळाली ५० मॅग्‍ना १३.५-मीटर बसेसची ऑर्डर

Santosh Sakpal May 27, 2023 04:47 PM

मुंबई,  : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज विजयानंद ट्रॅव्‍हल्‍सकडून ५० मॅग्‍ना १३.५-मीटर बसेससाठी प्रतिष्ठित ऑर्डर मिळाल्‍याची घोषणा केली. उच्‍च दर्जाची डिझाइन व प्रगत वैशिष्‍ट्यांसाठी ओळखल्‍या जाणाऱ्या अत्‍याधुनिक मॅग्‍ना बसेस मान्‍य करण्‍यात आलेल्‍या कराराच्‍या अटींनुसार टप्‍प्‍याटप्‍प्‍याने विजयानंद ट्रॅव्‍हल्‍सला वितरित करण्‍यात येतील. या फुली बिल्‍ट बीएस-६ डिझेल बसेस आंतरशहरीय परिवहन क्षेत्रातील आरामदायीपणा, इंधन कार्यक्षमतता व विश्‍वसनीयतेचे मानक पुनर्परिभाषित करण्‍यास सज्‍ज आहेत.


आपला आनंद व्‍यक्‍त करत विजयानंद ट्रॅव्‍हल्‍स प्रायव्हेट लिमिटेडचे व्‍यवस्थापकीय संचालक श्री. शिवा संकेश्‍वर म्‍हणाले, ‘‘आम्‍हाला टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आणि आमच्‍या ताफ्यामध्‍ये त्‍यांच्‍या अत्‍याधुनिक मॅग्‍ना बसेसचा समावेश करण्‍याचा आनंद होत आहे. या बसेस आमच्‍या बहुमूल्‍य प्रवाशांना आरामदायी व विश्‍वसनीय प्रवास अनुभव देण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाशी परिपूर्णरित्‍या संलग्‍न आहेत. आम्‍हाला विशेषत: मॅग्‍ना बसेसच्‍या प्रगत आरामदायी वैशिष्‍ट्यांमध्‍ये रूची आहे, ज्‍या प्रवासी व ड्रायव्‍हर्सची सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री घेण्‍यामध्‍ये साह्य करतील. आम्‍ही प्रवाशांना सर्वोत्तम प्रवास अनुभव देण्‍यास आणि टाटा मोटर्ससोबत यशस्‍वी सहयोग करण्‍यास त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.’’


याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या प्रॉडक्‍ट लाइन - बसेसचे उपाध्‍यक्ष श्री. रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ‘‘आम्‍हाला विजयानंद ट्रॅव्‍हल्‍ससोबत सहयोग करण्‍याचा आणि त्‍यांना आमच्‍या दर्जात्‍मक मॅग्‍ना बसेस प्रदान करण्‍याचा आनंद होत आहे. ही ऑर्डर अपवादात्‍मक दर्जा, कार्यक्षमता व ग्राहक समाधान वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमच्‍या बसेस विजयानंद ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांच्‍या निष्‍ठावान प्रवाशांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासोबत त्‍यापलीकडे जातील. आमचा परिवहन उद्योगाला उच्‍च दर्जाच्‍या, विश्‍वसनीय, ग्राहकांच्‍या गरजांनुसार विशेषरित्‍या डिझाइन केलेली वाहने प्रदान करण्‍याचा दीर्घकालीन इतिहास आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमचा सहयोग दोन्‍ही कंपन्‍यांसाठी लाभदायी ठरेल.’’


१३.५-मीटर टाटा मोटर्स मॅग्‍ना बसमध्‍ये भावी कमिन्‍स ६-सिलिंडर इंजिन आहे, जे अपवादात्‍मक कार्यक्षमता वितरित करते. एबीएस आणि अॅण्‍टी-रोल बार प्रवाशांना मन:शांती देतात, तर पॅराबोलिक लीफ-स्प्रिंग व रिअर एअर सस्‍पेंशन प्रवासादरम्‍यान उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणाची खात्री देतात. बसमध्‍ये प्रगत तंत्रज्ञान सुविधा आहेत, जसे गिअर शिफ्ट अॅडवायजर आणि टाटा मोटर्सची फ्लीट एज कनेक्‍टीव्‍हीटी सिस्‍टम. टाटा मोटर्स दर्जा, तसेच अद्वितीय प्रवासी आरामदायीपणा, अपवादात्‍मक इंधन कार्यक्षमता आणि मालकीहक्‍काचा इकोनॉमिकल खर्च याप्रती कटिबद्ध आहे. टाटा मोटर्स मॅग्‍ना बस ४ वर्षांच्‍या / ४ लाख किलोमीटरच्‍या वॉरंटीसह येते