मुंबई : अव्वल चार पटांवर बरोबरीची मालिका सुरू असतानाच, १२ वर्षीय अर्णव थत्ते याने तिसऱ्या मानांकित अथर्व सोनी याला पराभूत करत संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे इंडियन चेस स्कूलतर्फे आयोजित ३६० वन वेल्थ ग्रां. प्रि. चेस सीरिजमध्ये अर्णव याने चार फेऱ्यांअखेर चार गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे.
अथर्वच्या कारो-कान बचाव पद्धतीने खेळल्या गेलेल्या डावाला अर्णवने दमदार प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यात ही लढत बरोबरीत सुटेल, असे सर्वांना वाटत होते. पण अर्णवने केलेल्या गंभीर चुकीमुळे तो पराभवाच्या छायेत होता. त्याच वेळेला अर्णववर मात करण्याऐवजी अथर्व यानेही महत्त्वाची चूक केली. हीच चूक त्याच्या अंगाशी आली, त्यामुळे त्याला हा डाव गमवावा लागला.
तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर असलेल्या गुरु प्रकाश आणि दर्श शेट्टी यांना कडवे आव्हान लाभले. त्यामुळे चौथ्या फेरीत त्यांनी अनुक्रमे कुश अगरवाल आणि अर्जुन सिंग यांच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. या निकालामुळे सध्या या चार खेळाडूंनी संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्या साथीला तन्मय मोरे, इशान तेंडोलकर आणि प्रथमेश गावडे हेसुद्धा दुसऱ्या स्थानी आहेत.
चौथ्या फेरीतील महत्त्वपूर्ण निकाल
कुश अगरवाल (३*) बरोबरी वि. गुरु प्रकाश (३*)
दर्श शेट्टी (३*) बरोबरी वि. अर्जुन सिंग (३*)
अर्णव थत्ते (४) विजयी वि. अथर्व सोनी (३)
मुकुल राणे (३*) बरोबरी वि. इशान तेंडोलकर (३*)
प्रथमेश गावडे (३*) विजयी वि. श्रावण अग्रवाल (२*)
शौनिश जयस्वाल (३*) विजयी वि. पलाश मापरा (२*)
सम्विद पासबोला (२*) पराभूत वि. तन्मय मोरे (३*)
मैत्रेयी बेरा (२) पराभूत वि. पुर्वान शहा (३)
यामिनी श्रीराम (३) विजयी वि. गणेश कदम (२)
प्रभाकर आरीव (३) विजयी वि. यश टंडन (२)