श्री उद्यानगणेश मंदिर चषकासाठी आजपासून शालेय ४८ संघ झुंजणार

Santosh Sakpal January 09, 2025 05:19 PM

NHI/REPORTER/ANAGHA SAKPAL 

Mumbai :  श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित मुंबई-ठाणे परिसरातील शालेय ४८ कबड्डी संघ विजेतेपदाचा श्री उद्यानगणेश मंदिर चषक पटकाविण्यासाठी झुंजणार आहेत. ही स्पर्धा १० व ११ जानेवारी २०२५ दरम्यान शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये होणार असून उद्घाटनीय लढत मुलांमध्ये आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल विरुध्द बीएमसी अँटोप हिल स्कूल यामध्ये तर मुलींमध्ये एसआयईएस हायस्कूल विरुध्द विनय हायस्कूल यामध्ये शुक्रवारी सकाळी ९.०० वा. होईल. सहभागी संघांतील सर्व खेळाडूंना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार व्यवस्थेची माहिती समितीचे अध्यक्ष प्रकाश परब व व्यवस्थापक संजय आईर यांनी दिली.


     अजिंक्यपदाच्या दावेदारीसाठी मुलांमध्ये गतविजेता आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, उपविजेता मारवाडी विद्यालय, प्रभादेवी बीएमसी सेकंडरी स्कूल, चुनाभट्टी मुंबई पब्लिक स्कूल, उत्कर्ष मंदिर, दासिल्व्हा हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, श्री गौरीदत्त मित्तल विद्यालय, नवी मुंबई बीएमसी स्कूल, टिळक नगर एमपीएस, जनता शिक्षण संस्था, डिसोझा हायस्कूल, जनता शिक्षण संस्था तर मुलींमध्ये गतविजेते एसआयईएस हायस्कूल, उपविजेते उत्कर्ष मंदिर, बालमोहन विद्यामंदिर, केएमएस इंग्लिश मिडीयम हायस्कूल, श्री गौरीदत्त मित्तल विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, मराठा हायस्कूल आदी संघांमध्ये अटीतटी होईल. परिणामी दर्जेदार कबड्डीचा थरार प्रेक्षकांना पाहण्यास मिळेल. मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/-, अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/-, तृतीय क्रमांकास रोख रु.२,०००/- व चतुर्थ क्रमांकास रु.१,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत.