आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धेत टाटा मिलचा अभिषेक कदम विजेता

Santosh Sakpal December 13, 2024 11:05 PM

मुंबई:राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धा टाटा मिलच्या अभिषेक कदमने जिंकली. अचूक फटक्यांची आतषबाजी करीत अभिषेक कदमने सहजसुंदर विजयाने अंतिम फेरीत धडक देणाऱ्या पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरला २५-० असा नील गेम दिला आणि विजेतेपदाला गवसणी घातली. जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधील २८ स्पर्धकांच्या आंतर कॅरम स्पर्धेत अनुज वर्पेने आसावरी गमरेचा १४-६ असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले.

   परेल येथील आरएमएमएस सभागृहामधील २४ मिल कामगारांच्या कॅरम स्पर्धेत अभिषेक कदमने अंतिम विजेतेपद, विशाल सागवेकरने अंतिम उपविजेतेपद, एनटीसीच्या विलास काळे व इंदू मिलच्या राकेश कोचरेकरने उपांत्य उपविजेतेपद तर आरएमएमएसच्या ओमकार हडशीने, इंदू मिलच्या गजानन कदमने, अजय सोळंकीने, आरएमएमएसच्या हरीश देठेने उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले. स्व. गं. द. आंबेकर स्मृती आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेत अनुज वर्पे अंतिम विजेता, आसावरी गमरे अंतिम उपविजेती, प्रज्वल तरे व सचिन पुजारी उपांत्य उपविजेते तर दीक्षा येलवे, अर्पिता कांबळे, देवेन बनसोडे उपांत्यपूर्व उपविजेते ठरले.

     स्व. गं. द. आंबेकर स्मृती आंतर कॉलेज बुध्दिबळ स्पर्धेत प्रतिक कनोजियाने (४ गुण) प्रथम, देवेन बनसोडेने (३ गुण) द्वितीय, करण कदमने (३ गुण) तृतीय, कौस्तुभने (२.५ गुण) चौथा, चिन्मय मेस्त्रीने (२ गुण) पाचवा, हर्षदा साळुंखेने (२ गुण) सहावा, भावेशने (२ गुण) सातवा तर नैनील शिखरेने (२ गुण) आठवा पुरस्कार जिंकला. क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, चंद्रकांत करंगुटकर व लीलाधर चव्हाण यांनी पंचाचे कामकाज यशस्वी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सीबीडब्लूइ प्रादेशिक संचालक चंद्रसेन जगताप, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, माजी नगरसेवक सुनील अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ जल्लोषात संपन्न झाला.     



******************************