इतकं निर्लज्ज सरकार, मुख्यमंत्र्यांचा बालिशपणा कधी पाहिला नाही : आदित्य ठाकरें ची एकनाथ शिंदेवर टीका !
Santosh Gaikwad
June 25, 2023 05:50 PM
मुंबई : पाऊस आल्याचे स्वागत करा तक्रार काय करता ? या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आतापर्यंत इतकं निर्लज्ज सरकार, मुख्यमंत्र्यांचा बालिशपणा कधी पाहिला नाही अश्या शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, १०० मिलिमीटर पावसात मुंबई मध्ये कधी पाणी तुंबत नाही तिथे पाणी तुंबल.घटना बाह्य मुख्यमंत्री कुठे होते मला काय माहित. मिंदेचं एक स्टेटमेंट वाचलं.पाऊस आल्याचे स्वागत करा तक्रार काय करता? हे स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो. दोन गोष्टींवर लक्ष वेधले आहे. रस्ते घोटाळा आणि नाले सफाई..या सरकार ने वेगवेगळी आश्वासन दिलीत दहीहंडी ला हे खेळाचे दर्जा देणार होते. एक सुद्धा आश्वासन पूर्ण केले नाही.
रस्त्यामध्ये सहा हजार कोटी चा घोटाळा आहे..गेल्या दीडशे वर्षात पन्नास रस्ते एवढंच टार्गेट ठेवले हे सगळ्यात लहान टार्गेट आहे..31 मे पर्यंत आपली कामे पूर्ण होतात आणि तात्पुरते काम आपण साधार साधारणपणे बंद करतो.. नागरिकांना त्रास होत आहेत..विनाकारण रस्ते खोदून ठेवले आहेत अशी लोकांची तक्रार आहे.. जेवढ्या मिटिंग महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झाल्या तेवढी बैठक ही यासाठी झाली असती.तर असे स्टेटमेंट द्यायची वेळ आली नसती.. जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायले एकही मिंढे गटातील कोणी आला नाही असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतः नाले सफाई साठी प्रत्येक विभागात जायचे.किती पम्प चालू आहेत. किती नाहीत कुठे पाणी साचेल अशी सर्व आपण पाहणी करायचो..पम्प वाढवले अस घटना बाह्य मुख्यमंत्री बोलले पण ते कुठेही दिसलें नाहीत...आम्ही जिथे जिथे पाणी तुंबले तिथे आम्ही जायचो आणि काम करून घ्यायचो.पण यांचे हे स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो.. कर्नाटकामध्ये जे सरकार होते ते 40% भ्रष्ट होते.हे 100% भ्रष्ट आहे .असा टोला ठाकरे यांनी शिंदे सरकारवर लगावला.