MUMBAI -SHIVNER
यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आली आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत.
गेली पाच दशके क्रीडा व कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उमेदीच्या काळात कबड्डी व व्यायाम प्रकारात उल्लेखनीय खेळ केला होता. क्रीडापटूना प्रोत्साहन देण्यासाठी २९ मे ते ८ जून दरम्यान बुध्दिबळसह क्रिकेट, कबड्डी, कॅरम, सूर्यनमस्कार, बैठका आदी स्पर्धांचे आयोजन अमृत महोत्सवी पदार्पणातील वाढदिवसानिमित्त होणार आहे.
अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेत किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटांमधील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना प्रमाणपत्रासह चषक पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २८ मेपर्यंत संपर्क साधावा.
********************