Shivner news agency/Reporter -Santosh Sakpal
MUMBAI :आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर रोहित सोळंकीची हॅटट्रीक व सुरेश तांबेची दमदार फलंदाजी यामुळे जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ४ विकेटने पराभव केला आणि सलामीचा सामना जिंकला. नितीन कांबळेची दमदार फलंदाजी केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळू शकली नाही. स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख पार पडले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेत जे.जे. हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. भरवंशाचे सलामीवीर डॉ. विवेक राजभर लवकर धावचीत होऊनही नितीन कांबळेने (२१ चेंडूत ३२ धावा) आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे डावाच्या मध्यापर्यंत केडीए संघाने १२ व्या षटकाला ५ बाद ८२ धावा रचल्या. परंतु त्यानंतर मध्यमगती गोलंदाज रोहित सोळंकीने (४ धावांत ४ बळी) हॅटट्रीक साधल्यामुळे केडीए संघ १४.२ षटकामध्ये ८६ धावांत गारद झाला. सुरेश तांबे (१९ चेंडूत २६ धावा) व अमोल दरेकर (७ चेंडूत नाबाद १२ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटल संघाने विजयी लक्ष्य १३ व्या षटकाला ६ बाद ८९ धावा फटकावीत साध्य केले. रोहित सोळंकीने सामनावीर व नितीन कांबळेने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविला. टाटा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे माजी कप्तान डॉ. एस.एच. जाफरी यांचा स्पर्धेनिमित्त गौरव होणार आहे.