मुंबई, : यजमान बॉम्बे जिमखानाच्या नाहिदा दिवेचा आणि शैलेश डागा जोडीने दिलीप सुखटणकर (वनिता समाज) आणि सतिंदर मल्होत्रा जोडीचा (बाल्कनजी बारी) 21-9, 21-9 असा पराभव करताना आदित्य बिर्ला सनलाइफ प्रायोजित 29व्या जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत दिवेचा आणि डागा जोडीचा सामना बिबाश चॅटर्जी (कॅथलिक जिम) आणि योगेश संघवी (जॉली जिम) यांच्याशी होईल. दुसर्या उपांत्य फेरीत त्यांनी बॉम्बे जिमखान्याच्या गौतम अशरा आणि नवल कुमार जोडीवर 22-20, 21-14 असा विजय मिळवला.
सांघिक स्पर्धेत (टीम चँपियन्सशीप) क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि एमसीएफच्या दोन्ही संघांसह बॉम्बे जिमखाना ए, एनएससीआय, चेंबूर जिम आणि अंधेरी एससी संघांनी उपांत्य फेरी गाठली.
दरम्यान, सीसीआय ए संघाने कॅथलिक जिमखाना संघावर 2-1 तसेच सीसीआय बी टीमने एमसीए संघावर 2-0 अशी मात केली.