मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. होळीनंतर महाराष्ट्रात तापमानात वाढ होऊन कडक उन्हाळा जाणवेल पुढचे चार दिवस तापामानात वाढ होण्याची शक्यता असून काळजी घेण्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे २७ मार्चपर्यंत मुंबई पुणे आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली वाढण्याची शक्यता आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात कोरडे हवामान आहे त्यातच दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे उषणवारे वाहत आहेत त्यामुळे उन्हाचा कडाका वाढू लागला आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट ४० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.