बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत ऋग्वेद, ऋषिकेश, अजिंक्यची विजयी सलामी

Santosh Sakpal September 21, 2024 04:48 PM

मुंबई /शिवनेर/ संतोष सकपाळ 

    बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत ऋग्वेद फराडे, ऋषिकेश शिंदे, अजिंक्य नवगिरे, अरविंद अगरवाल, राजेश कुमार आदींनी सलामीचे सामने जिंकले. अतिशय चुरशीच्या सामन्यात ३-० असा दमदार प्रारंभ करणाऱ्या ऐश्वर्य मिश्राचे आव्हान उशिरा सूर सापडलेल्या ऋग्वेद फराडेने १५-११ असे संपुष्टात आणले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर स्पर्धेमधून  पहिले चार विजेते-उपविजेते खेळाडू १७ व १८ ऑक्टोबर रोजी राजकोट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेमध्ये मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


   बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने दादर-पश्चिम येथे आयोजित बीओबी बॅडमिन्टन निवड चाचणी महिला एकेरीत पूजा मोरेने पी. लोकेश्वरीचा ११-४, ११-३ असा तर गरिमा श्रीवास्तवने के. प्रवाल्लिकाचा ११-५, ११-३ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी जिंकली. पुरुष एकेरीत प्रारंभी जोरदार मुसंडी मारणाऱ्या श्रीणु मुदावाथला ऋषिकेश शिंदेने १५-८ असे हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात अजिंक्य नवगिरेने सुश्रुत सोनकुसलेवर १५-६ असा, अरविंद अगरवालने झुबीन पुजारावर १५-३ असा, अविनाश नारल्लाने वासुदेववर १५-५ असा, दिव्यारंजन आचर्यने सचिन गुदलमाणीवर १५-६ असा, राजेश कुमारने चंदन बर्न्वलवर १५-५ असा आणि एन. शिवाने सौरभ सिंगवर १५-५ असा विजय मिळविला.     .


 ******************