बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत अनाहिता, स्वरा, थिया, मैत्रेयी, आर्श, अरहान विजेते
Santosh Sakpal
August 11, 2024 04:04 PM
मुंबई: NHI NEWS AGENCY
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप विविध वयोगट बुध्दिबळ स्पर्धेत मुलींमध्ये अनाहिता महाजन, स्वरा लड्डा, थिया वागळे, मैत्रेयी बेरा यांनी तर मुलांमध्ये इवान दुबे, आर्श मिश्रा, नैतिक पालकर, अरहान खान यांनी विजेतेपद पटकाविले. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेत ६ वर्षाखालील मुलींमध्ये अनाहिता महाजनने (५ गुण) प्रथम, चैतन्या नागराळेने (४ गुण) द्वितीय, वियोना जैनने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये इवान दुबेने (४ गुण) प्रथम, अबीर अग्रवालने (४ गुण) द्वितीय, अधवान ओसवालने (४ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला.
८ वर्षाखालील मुलींमध्ये स्वरा लड्डाने (४ गुण) प्रथम, मीरा शेट्टीने (३ गुण) द्वितीय, आद्या भटने (२ गुण) तृतीय तर मुलांमध्ये आर्श मिश्राने (५ गुण) प्रथम, अधरित दुबेने (४ गुण) द्वितीय, आहन मिश्राने (३ गुण) तृतीय; १० वर्षाखालील मुलींमध्ये थिया वागळेने (५ गुण) प्रथम, मृणमयी डावरेने (३ गुण) द्वितीय, सिम्रिता बुबनाने (२.५ गुण) तृतीय तर मुलांमध्ये नैतिक पालकरने (४ गुण) प्रथम, नील भटने (४ गुण) द्वितीय, अगस्त्य भामरेने (३ गुण) तृतीय आणि १२ वर्षाखालील मुलींमध्ये मैत्रेयी बेराने (४.५ गुण) प्रथम, आराध्या सिंगने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (३ गुण) तृतीय तर मुलांमध्ये अरहान खानने (४.५ गुण) प्रथम, कृषीव सुरेकाने (४ गुण) द्वितीय, संकीत संघवीने (३.५ गुण) तृतीय क्रमांक पटकाविला. बँक ऑफ बडोदाचे असिस्टंट जनरल मॅनेजर घनश्याम दास यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव पी.बी. भिलारे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.
******************************