रत्नागिरी : खेडमधील गोळीबार मैदानावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा घेतली होती त्याच मैदानावर रविवार १९ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. याच मैदानावरून शिंदे हे उध्दव ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहेत. त्यामुळे या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. खेडमधील गोळीबार मैदानातही विराट जाहीर सभा झाली होती. आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. शिंदे गटाकडून यासभेची जोरदार तयारी सुरू असून, ठाकरेंच्या आरोपाला ते कसे उत्तर देतात याकडे सगळयांच्या नजरा लागल्या आहेत. या जाहीर सभेचा टिझरही लॉन्च करण्यात आला आहे.