ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा १८ मे पासून रंगणार
Santosh Sakpal
May 15, 2023 06:18 PM
मुंबई, : दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने मुंबईचा १४ वर्षाखालील खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून १८ मे पासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेतील सामने प्रत्येकी दोन-दोन दिवसांचे खेळविण्यात येणार असून सदर सामने ओव्हल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे मैदान आणि कर्नाटक सपोर्टींग क्लबच्या मैदानात खेळविण्यात येणार आहेत. यंदा या स्पर्धेचे २८वे वर्ष असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुनील गावस्कर संघ, दिलीप वेंगसरकर संघ, रवी शास्त्री संघ आणि सचिन तेंडुलकर संघ अशा चार संघांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. २५ आणि २६ मे रोजी अंतिम साखळी सामने खेळविण्यात येणार असून २६ मे रोजी सामना संपल्यानंतर ओव्हल येथील वेंगसरकर अकादमीच्या मैदानात पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून यंदाच्या आय.पी. एल. मधील सर्वात यशस्वी ठरलेला फलंदाज यशस्वी जैस्वाल उपस्थित राहणार असून त्याच्याच हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
स्पर्धेचा कार्यक्रम -
१८ - १९ मे - गावस्कर संघ वि. वेंगसरकर संघ - ओव्हल मैदान
शास्त्री संघ वि. तेंडुलकर संघ - कर्नाटक सपोर्टींग
२२ -२३ मे - वेंगसरकर संघ वि. तेंडुलकर संघ - कर्नाटक सपोर्टींग
शास्त्री संघ वि. गावस्कर संघ - ओव्हल मैदान
२५-२६ मे - शास्त्री संघ वि. वेंगसरकर संघ - ओव्हल मैदान
तेंडुलकर संघ वि. गावस्कर संघ - कर्नाटक सपोर्टींग.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने निवडण्यात आलेले चार संघ पुढीलप्रमाणे -
रवी शास्त्री संघ - १. शाहिद खान (कर्णधार) २. विधिराज शुक्ला ३. सामरिध भट ४. प्रितेश बेंगानी ५. गंधर्व हळदणकर ६. निर्भय केणी ७. राजवर्धन जाधव (यष्टीरक्षक) ८. आरव गुप्ता ९. नीरज धुमाळ १०. शाश्वत नाईक ११. धैर्य म्हात्रे १२. अमान सिंग १३. शॉन कोरगावकर १४. युवराज पाटील
सचिन तेंडुलकर संघ - १. वेदांत गोरे २. युग असोपा ३. आयुष शिंदे ४. राम शांडिल्य ५. ओंकार कोळी ६. युवराज भिंगार्डे ७. धैर्य पाटील ८. आकाश मांगडे (यष्टीरक्षक) ९. केदार मालुसरे १०. सिद्धांत जाधव ११. युग पाटील १२. अद्वैत जोशी १३. अद्वैत भट १४. अथर्व केणी .
सुनील गावस्कर संघ - १. नाथानील परेरा (कर्णधार) २. सोहम कांगणे ३. यश म्हात्रे ४. ओम बांगर ५. वेद तेंडुलकर ६. अरहान पटेल ७. प्रयाग शाह ८. मोहम्मद अरमान खान (यष्टीरक्षक) ९. नील देवरेकर १०. सारांश शर्मा ११. अब्दुल रेहमान खान १२. झैद खान १३. श्लोक कडव १४. वीर शिंदे
दिलीप वेंगसरकर संघ - आयुष शेट्ये (कर्णधार) २. सुधाण सुंदरराज ३. आर्यन म्हात्रे ४. हर्ष कदम ५. शौर्य नार्वेकर ६. क्रिश उपाध्याय (यष्टीरक्षक) ७. रोनक सिंग ८. सुमेध देसाई ९. अभिषेक पांडे १०. युवान शर्मा ११. अगस्त्य उपाध्याय १२. दर्शन राठोड १३. देवांग तांडेल १४. स्वयम वामने .