पहिल्या टप्पा : १९ एप्रिलला मतदान.., ५ लोकसभा, ९७ उमेदवार रिंगणात !
Santosh Gaikwad
March 30, 2024 10:26 PM
मुंबई : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी रामटेकमध्ये एकुण ३५ उमेदवार पात्र ठरले त्यापैकी ७ जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या २८ आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार २६ आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये २२ उमेदवारांपैकी ४ जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या १८ आहे, गडचिरोली-चिमूर मध्ये १२ उमेदवारांपैकी २ जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या १० तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार १५आहेत.
मतदानासाठी पुढील १२ पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा आवश्यक
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / PSU / Public Limited कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / MLC यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्र, अद्वितीय अपंगत्व आयडी (UDID) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार.
सदर माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली आहे.
क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण मतदान केंद्रे
1 9- रामटेक 10,44,891 10,04,142 52 20,49,085 2,405
2 10 - नागपुर 11,13,182 11,09,876 223 22,23,281 2,105
3 11- भंडारा-गोंदिया 9,09,570 9,17,604 14 18,27,188 2,133
4 12-गडचिरोली -चिमुर 8,14,763 8,02,434 10 16,17,207 1,891
5 13-चंद्रपुर 9,45,736 8,92,122 48 18,37,906 2,118
एकूण 48,28,142 47,26,178 347 95,54,667 10,652